‘पाणी एक्स्प्रेस’ची तिसरी खेप!

By Admin | Updated: April 15, 2016 02:06 IST2016-04-15T02:06:28+5:302016-04-15T02:06:28+5:30

मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी फेरी पूर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात संध्याकाळी सहा वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहोचली़ त्यानंतर विहिरीत पाणी

The third consignment of 'Water Express' | ‘पाणी एक्स्प्रेस’ची तिसरी खेप!

‘पाणी एक्स्प्रेस’ची तिसरी खेप!

मिरज/लातूर : मिरजेहून कृष्णेचे पाणी घेऊन जलपरीने गुरुवारी तिसरी फेरी पूर्ण केली़ लातूर रेल्वे स्थानकात संध्याकाळी सहा वाजता दहा वॅगन घेऊन ही जलपरी पोहोचली़ त्यानंतर विहिरीत पाणी उतरविण्यास प्रारंभ झाला. तिसऱ्या खेपेलाही पाच लाख लिटर्स पाणी आणण्यात आले़
गेल्या दोन दिवसांपासून जलपरीच्या फेऱ्या सुरु आहेत़ शुक्रवारी आणखी दहा टँकर पाठविण्यात येणार असून मिरज
रेल्वे यार्डापर्यंत जलवाहिनीचे
काम पूर्ण झाल्यानंतर सोमवारपासून ५० टँकर भरून रेल्वे लातूरला
जाणार आहे.
मिरजेतून सोमवारी, बुधवारी व त्यानंतर गुरुवारी दहा टँकरची तिसरी खेप लातूरला रवाना झाली. आणखी दहा टँकर भरण्याचे काम रेल्वे स्थानकात सुरू असून शुक्रवारपर्यंत टँकरमध्ये पाणी भरल्यानंतर ही रेल्वे लातूरला पाठविण्यात येणार आहे. त्यामुळे लातूरला नियमित पाणी पुरवठा सुरू होणार
आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: The third consignment of 'Water Express'