शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

सलग तिस-या वर्षी महाराष्ट्र देशातील सर्वात भ्रष्ट राज्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2017 15:58 IST

महाराष्ट्राने सलग तिस-या वर्षी सर्वात भ्रष्ट राज्य असण्याचा 'गौरव' प्राप्त केला आहे.

नवी दिल्ली:  महाराष्ट्राने सलग तिस-या वर्षी सर्वात भ्रष्ट राज्य असण्याचा 'गौरव' प्राप्त केला आहे. राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाचा अहवाल (एनसीआरबी) प्रसीद्ध झाला आहे. यानुसार 2016 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराचे 1 हजार 16 प्रकरणं समोर आली. म्हणजे देशातील एकूण भ्रष्टाचाराच्या तब्बल 22.9 टक्के घटना या एकट्या महाराष्ट्रात समोर आल्या आहेत. 2015 मध्ये राज्यात भ्रष्टाचाराच्या 1279 तर 2014 मध्ये 1316 घटना समोर आल्या होत्या, त्या तुलनेत 2016 मध्ये आकडेवारी कमी झाल्याचं दिसतं. 

महाराष्ट्राखालोखाल ओडिसाचा नंबर लागतो. ओडिसामध्ये भ्रष्टाचाराच्या 569 घटना समोर आल्या आहेत. त्यानंतर केरळमध्ये 430 , मध्य प्रदेशमध्ये 402 , आणि राजस्थानमध्ये 387 प्रकरणं समोर आली आहेत. 

  • राष्ट्रीय गुन्हे नोंद विभागाच्या अहवालामध्ये महाराष्ट्राचा क्रमांक तिसरा-

महाराष्ट्रात गुन्ह्य़ांची संख्या 2015 मधील 4 लाख 23 हजारांवरून 2016 मध्ये 4 लाख 30 हजारांवर गेली. पण तरीसुद्धा महाराष्ट्रातील प्रमाण देशाच्या सरासरीपेक्षा कमी म्हणजे 217 इतके आहे.

  • सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशात-

देशातील सर्वाधिक जास्त गुन्ह्य़ांची नोंद उत्तर प्रदेशातच झाली आहे. 2016 मधील एकूण गुन्ह्य़ांची संख्या 48 लाख 31 हजार 515 इतकी आहे. 2015 मध्ये हीच संख्या 47 लाख 10 हजार 676 इतकी होती. म्हणजे गुन्ह्य़ांमध्ये 2.6 टक्क्यांनी वाढ झाली. त्यापैकी उत्तर प्रदेशात 2 लाख  82 हजार गुन्ह्य़ांची नोंद आहे. त्यापाठोपाठ मध्य प्रदेश, महाराष्ट्र आणि केरळचा नंबर आहे. महिलांवरील अत्याचारांच्या आणि दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली नोंदविलेल्या गुन्ह्य़ांच्या संख्येतही किंचित वाढ झाल्याचे अहवाल सांगतो.

  • 'मर्डर'मध्ये योगींचं राज्य नंबर 1-

2016 मध्ये अपेक्षेप्रमाणे देशातील सर्वाधिक जास्त हत्यांची नोंद उत्तर प्रदेशात झाली असल्याचं समोर आलंय. गेल्या वर्षी खूनाच्या येथे सर्वाधिक 4,889 घटना घडल्या आहेत. त्या खालोखाल बिहारचा नंबर आहे, येथे 2 हजार 581 खून पडले. 

टॅग्स :Corruptionभ्रष्टाचारMaharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार