शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
अरेरे... देवाचं कामही नीट केलं नाही! तीन वर्षांत ५० कोटींचा खर्च तरीही विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या छताला गळती
12
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
13
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
14
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
15
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
16
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
17
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
18
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
19
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 

ते 'गाडीभर' पुरावे म्हणत होते, आपल्याकडे कुणी 'सुटकेसभर'ही म्हणत नाही? सरकारच्या कारभारावर पृथ्विराज चव्हाण म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 23, 2024 10:51 IST

"अलिकडच्या काळात शिंदे सरकारने जी बेधुंद टेंडर काढली आहेत, रोड कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. त्याच्या किंमती वाढून, त्याच्या किंमती वाढवून कशा पद्धतीने रोड काँट्रॅक्ट झाले आहेत, त्याचाही पाढा आम्ही वाचणार आहोतचना.""

काँग्रेस नेते पृथ्विराज चव्हाण यांनी राज्यातील महायुती सरकारच्या कारभारासंदर्भात भाष्य केले आहे. त्यांनी महायुती सरकारची स्थापना, अदानींचा धारावी पुनर्वसन प्रकल्प, अलिकडच्या काळात शिंदे सरकारने काढलेली टेंडर्स, रोड कॉन्ट्रॅक्ट आणि या निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरणामा अशा अनेक विषयांवर रोखठोक भाष्य केले आहे. ते लोकमतसोबत बोलत होते. यावेळी मुंबई लोकमतचे संपादक अतुल कुलकर्णी आणि लोकमत डिजिटल मीडियाचे संपादक आशिष जाधव यांनी त्यांच्याशी संवाद साधला.

यावेळी, महाराष्ट्रात या सरकारने काय घोटाळे केले किंवा या सरकारवर भ्रष्टाचाराचे जे काही आरोप केले जात आहेत, या सर्व गोष्टींसंदर्भात आपल्या सारख्या अभ्यासू नेत्याने, ज्यांना अर्थ विषयाची जाण आहे, आपण मंत्रालयात मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे, राज्य पाहिले आहे, कुणी बोलत का नाही सरकारच्या विरोधात? असा प्रश्न विचारला असता पृथ्विराज चव्हाण म्हणाले, "माझ्याकडे जाहीरणामा करायची जबाबदारी दिली होती. तो दोन तीन भागांत येईल. एक आमच्या काही गॅरंटीज असतील, ते गॅरंटी कार्ड म्हणून प्रत्येक घरात पोहोचवण्याचा प्रयत्न करू. याशिवाय आम्ही 100 दिवसांत काय करू याची एक सुची येईल आणि नंतर आमचे पाच वर्षांचे व्हिजन काय असेल? अशा दोन तीन भागांत आम्ही जाहीरनामा करणार आहोत. जाहीरनामा फार मोठा झाला तर तो कुणी वाचत नाही आणि ती केवळ एक यादी असते. मग आपापला घटक आपापले मुद्दे घेतो आणि बाकी कुणी तिकडे वाचत नाही. म्हणून आम्ही अशा पद्धतीने कारायचा प्रयत्न करतोय." 

...ही चर्चा होऊद्या ना, आम्हाला हवीच आहे -यावर चव्हाण यांना पुन्हा एकदा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर आणत प्रश्न विचारण्यात आला की, या सरकारवर भ्रष्टाचाराचे आरो होत आहेत, तर तुमच्याकडून, तुमच्यासारखे ज्येष्ठ नेते असतील, सुशिलकुमार शिंदे आहेत किंवा जे वरिष्ठ नेते आहेत ते कुणीच सरकारच्या कारभारावर बोलत नाहीत? यावर पृथ्विराज चव्हाण म्हणाले, "ज्या प्रकारे हे सरकार अस्तित्वात आले, हा मुख्यमुद्दा आहेचना आणि विशेषतः ज्या आमदारांनी पक्षांतर केले आहे, काही अर्थकारण करून. ती चर्चा ते घोषवाक्य लोकांच्या तोंडात आहे. तिथे हा मुद्दा अधिक चालेल. त्या आमदारांच्या बाबतीत. त्या मतदारांनी त्यांना विश्वासाने मते दिली आणि त्यांनी त्या विश्वासाचा सौदा केला. त्यामुळे ते जेव्हा मतदारांपर्यंत जातील, तेव्हा हे खरे आहे का, की तुम्ही 50-50 कोटी रुपये घेतले. मग काय झालं? मग ते सांगतील की, आम्ही असे नाही केले आम्ही विचाराने गेलो. ही चर्चा होऊद्या ना. आम्हाला हवीच आहे." 

यावर हे आमदारांविषयी झाले, आम्ही सरकारच्या कारभाराविषयी बोललो? यावर चव्हाण म्हणाले, एक भागा आमदारांचा विषय महत्वाचा आहेच. ज्याला 50 खोके म्हणून प्रसिद्धी मिळाली. त्यानंतर अलिकडच्या काळात शिंदे सरकारने जी बेधुंद टेंडर काढली आहेत, रोड कॉन्ट्रॅक्ट दिले आहेत. त्याच्या किंमती वाढून, त्याच्या किंमती वाढवून कशा पद्धतीने रोड काँट्रॅक्ट झाले आहेत, त्याचाही पाढा आम्ही वाचणार आहोतचना."

...पण, आपल्याकडे 'सुटकेसभर'ही कुणी म्हणत नाहीत, त्याचे काय?यावर, एक एक विषय घेऊन, मागे जसे देवेंद्र फडणवीस विरोधात होते, तेव्हा आमच्याकडे 'गाडीभर' पुरावे आहेत एरिगेशनचे, अशी भूमिका त्यांनी घेतली होती. पण, आपल्याकडे 'सुटकेसभर'ही कुणी म्हणत नाहीत, त्याचे काय? असा प्रश्न केला असता, चव्हाण म्हणाले, "म्हणायचेही नाही, आम्ही दाखवूना. आता अदानींच्या बाबतीत, मी विधानसभेत मुद्दा उपस्थित केला असताना, राधाकृष्ण विखे आणि आम्ही अदानींच्या धारावी पुर्वसन प्रकल्पाबद्दल श्वेतपत्रिका काढू, असे जाहीर आश्वासन  दिल्याचे आपणही दाखवले. मीही तेथे बोललो होतो. काय झाले त्या आश्वासनाचे? आज तुम्ही बेधडक मुंबई विकायला काढली आहे. हे मुद्दे निवडणुकीचे आहेतचना. आता ते आधी काढायचे की ऐन निवडणूक रंगात आल्यावर काढायचे? ते आम्ही ठरवू, कसे करायचे ते, असे चव्हाण म्हणाले.

बघा संपूर्ण मुलाखत... -

टॅग्स :Prithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसmaharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीMahavikas Aghadiमहाविकास आघाडी