शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

‘ते’एसएमएस शॉपिंग अ‍ॅपच्या पब्लिसिटीसाठी : मित्राच्या नावाने जमा पैसे प्रकरण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 19:34 IST

तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये पाठविल्याचे सांगून त्याखाली एक लिंक देण्यात आली आहे़. ती लिंक डाऊनलोड करा़ तसेच एका कोड नंबर दिला होता़. हे एसएमएस राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते़...

ठळक मुद्देदिल्लीतील एका कंपनीने हे बल्क एसएमएस पाठविण्याची सुविधा घेतली असल्याचे निष्पन्न

 पुणे : तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये जमा केले असल्याचे लाखो एसएमएस गेल्या काही दिवसांपासून लोकांना येत होते़. त्यामुळे ऑनलाईन फसवणूकीचा हा नवा प्रकार असल्याच्या संशयाने त्यावरील लिंक उघडून पाहा नका, असा इशारा देण्यात आला होता़. मात्र, हे एसएमएस एका शॉपिंग मोबाईल अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी पाठविण्यात आल्याचे पुणे सायबर क्राईम सेलने केलेल्या तपासात आढळून आले आहे़.  तुमच्या मित्राने तुमच्या खात्यात १ हजार रुपये पाठविल्याचे सांगून त्याखाली एक लिंक देण्यात आली आहे़. ती लिंक डाऊनलोड करा़ तसेच एका कोड नंबर दिला होता़. हे एसएमएस राज्यात मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते़. त्यामुळे हा ऑनलाईन शॉपिंगचा प्रकार असावा, असे वाटून ही लिंक ओपन करु नका, असे सांगणारे एसएमएस त्याबरोबर पाठविले जाऊ लागले होते़. त्याची तक्रार पुणे पोलिसांच्या सायबर क्राईम सेलकडे करण्यात आली होती़ . सायबर सेलने याची सखोल तपासणी केल्यावर हे बल्क एसएमएस उत्तर प्रदेशातील बीएसएनएलच्या पश्चिम विभागातून येत असल्याचे दिसून आले़. त्यानुसार बीएसएनएलकडून सायबर सेलने माहिती घेतल्यावर दिल्लीतील एका कंपनीने हे बल्क एसएमएस पाठविण्याची सुविधा घेतली असल्याचे आढळून आले़. सायबर सेलने या कंपनीशी संपर्क साधला़ त्यानंतर शनिवारपासून आता हे एसएमएस येणे बंद झाले आहे़.दिल्लीच्या एका कंपनीने काढलेल्या नवी मोबाईल अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविण्यात येत होते़. या कंपनीने हे काम दुसºया एका कंपनीला दिले होते़. त्यांनी दिलेल्या प्रमाणापेक्षा किती तरी अधिक पटीने हे एसएमएस पाठविण्यात आले़. त्यामुळे संपूर्ण राज्यभर गोंधळ निर्माण झाला़.या कंपनीकडे चौकशी केल्यावर त्यांनी आपल्या नवीन मोबाईल शॉपिंग अ‍ॅपच्या प्रसिद्धीसाठी हे एसएमएस पाठविल्याचे सांगितले़. यावर कोणी संपर्क साधला तर त्याने त्या अ‍ॅपवरुन पुढील काळात काही खरेदी केली तर त्याला त्याच्या बिलात ही एक हजार रुपयांची रक्कम वळती केली जाणार होती़. मात्र, त्याचा सर्वांनी विपरित अर्थ काढला गेल्याने फसवणूकीचा हा प्रकार असल्याचा समज निर्माण झाला़. याबाबत सायबर क्राईमचे पोलीस निरीक्षक जयराम पायगुडे यांनी सांगितले की, या कंपनीच्या अधिकाऱ्यांना आम्ही चौकशीसाठी बोलावले आहे़. ते सांगतात, तसाच त्यांचा हेतू होता का याबाबत अधिक तपास करत आहोत़. त्याचा काही गैर हेतू होता का याची पडताळणी केली जात आहे़ . 

टॅग्स :Puneपुणेdelhiदिल्लीfraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस