वारकरी संप्रदाय 'त्यांना' समजलाच नाही; शरद पवारांचे वारकरी परिषदेला प्रत्युत्तर
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2020 15:34 IST2020-02-08T15:34:12+5:302020-02-08T15:34:17+5:30
शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय वारकरी परिषदेने केला होता. शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं प्रसिद्धीला दिलं होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्याला पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले.

वारकरी संप्रदाय 'त्यांना' समजलाच नाही; शरद पवारांचे वारकरी परिषदेला प्रत्युत्तर
मुंबई - आपण प्रसिद्धीसाठी राजकारण करत नाही. कोणताही हेतू मनात ठेवून इथं आलो नाही. पंढरपूर, देहू आणि आळंदीला नेहमी येत असतो. मात्र याच प्रदर्शन करण्याचा माझा हेतू नसतो. तुम्हाला यायला परवानगी नाही, असं कोणी सांगत असेल तर त्यांना वारकरी संप्रदाय समजलाच नाही, असा टोला शरद पवार यांनी राष्ट्रीय वारकरी परिषदेला लगावला आहे.
शरद पवार हे हिंदूविरोधी असल्याचा खळबळजनक दावा राष्ट्रीय वारकरी परिषदेने केला होता. शरद पवार हे हिंदूविरोधी आहेत; त्यांना कार्यक्रमाला बोलावू नका, असं पत्रकच राष्ट्रीय वारकरी परिषदेनं प्रसिद्धीला दिलं होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता. त्याला पवारांनी चोख प्रत्युत्तर दिले.
कीर्तन परंपरेला आकार देण्यासाठी आळंदी येथे वारकरी शिक्षण संस्थेची स्थापना करणाऱ्या विष्णुपंत जोग महाराजांच्या शतकोत्तर पुण्यस्मरण सोहळ्यात ते बोलत होते. मला विठ्ठलाच्या दर्शनाला पंढरपूरला, तुकोबांच्या दर्शनाला देहूला, माऊलीच्या दर्शनला आळंदीला यायंच असतं. त्यासाठी मला कोणाची परवानगी घ्यावी लागत नाही. मात्र कोणी सांगत असेल तुम्हाला यायची परवानगी नाही, तर त्यांना वारकरी संप्रदायच समजला नाही, अशी टीका शरद पवारांना राष्ट्रीय वारकरी परिषदेच्या त्या पत्रकावर केली.
आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या स्वच्छतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी जबाबदारी घेतली. तसेच इंद्रायणी स्वच्छतेचे पवार घराण्याचे कर्तव्य असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात इंद्रायणीची स्वच्छता होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.