साधा रिक्षाचालक ते विरोधी पक्षनेते
By Admin | Updated: November 13, 2014 01:28 IST2014-11-13T01:28:49+5:302014-11-13T01:28:49+5:30
एकनाथ शिंदे यांच्या रुपाने ठाणो शहराला प्रथमच विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद लाभले आहे.
साधा रिक्षाचालक ते विरोधी पक्षनेते
एकनाथ शिंदे यांची 30 वर्षाची वाटचाल
ठाणो : एकनाथ शिंदे यांच्या रुपाने ठाणो शहराला प्रथमच विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद लाभले आहे. गेली तीन दशके शिवसेनेत वेगवेगळ्य़ा पदांवर कार्यरत असलेल्या शिंदेंनी आमदारकीची हॅट्रीकही साधली आहे.
किसननगरमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबात जन्म घेतलेल्या एकनाथ शिंदे यांचा कल प्रारंभापासूनच समाजकार्याकडे होता. स्वर्गीय आनंद दिघे यांच्या व्यक्तिमत्त्वाने ते प्रभावित झाले होते. शिवसेनाप्रमुखांच्या विचाराने ते झपाटून गेले होते. आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावण्यासाठी बारावीनंतर काही महिने त्यांनी ठाण्यात रिक्षाही चालवली. त्यानंतर, त्यांनी विविध कंपन्यांमध्ये नोकरी केली. किसननगर-2 मधील शिवसेनेची पहिली शाखा त्यांनीच उघडली व तेथे ते पहिले शाखाप्रमुख झाले.
सर्वप्रथम ते 1997 साली नगरसेवक झाले. 2क्क्1 ते 2क्क्5 ठाणो महापालिकेत सभागृह नेते होते. 2क्क्4 साली ठाणो शहर विधानसभा मतदारसंघातून ते 37 हजारांहून अधिक मतांनी विजयी झाले. 2क्क्5 साली ते शिवसेनेचे ठाणो जिल्हाप्रमुख झाले. 2क्क्9 मध्ये ते जिलचे संपर्कप्रमुख झाले आणि 2क्क्9 व 2क्14 मध्ये ते कोपरी-पाचपाखाडी या मतदारसंघातून प्रचंड मताधिक्क्याने विधानसभेवर गेले.
एकनाथ शिंदे यांनी एकाच वेळी जिल्हाप्रमुख आणि जिल्हासंपर्क प्रमुख ही दोन पदे समर्थपणो सांभाळली आहेत. संपूर्ण ठाणो जिल्हय़ात शिवसेनेची मजबूत बांधणी करणो, ठाणो आणि पालघर जिलंतील चारही विद्यमान खासदारांचा पराभव घडवून तेथे महायुतीचे चारही नवे चेहरे असलेले खासदार निवडून आणणो, जिल्हा शिवसेनेत बेरजेचे राजकारण करून इतर पक्षांतील समर्थ नेत्यांना शिवसेनेत आणणो व त्यांचे नेतृत्व स्थापित करणो, यामुळेच त्यांचे शिवसेनेतील स्थान नेहमी मजबूत होत गेले आहे.
एकनाथ शिंदेंचा परिचय
नाव : एकनाथ संभाजी शिंदे
निवास : शिवशक्ती भवन, पहिला मजला, किसननगर-2,
वागळे इस्टेट, ठाणो
शिक्षण : बारावी
पत्नी : लता शिंदे (गृहिणी)
चिरंजीव : डॉ. श्रीकांत शिंदे - खासदार
मतदारसंघ : कोपरी-पाचपाखाडी
आमदारकीची टर्म : तिसरी
पहिली टर्म ठाणो शहरमधून
दुसरी-तिसरी टर्म : कोपरी-पाचपाखाडी
दहीहंडी, गणोशोत्सव, नवरात्रोत्सव अशा उत्सवांच्या माध्यमातून त्यांनी युवाशक्तीला संघटित केले आणि शिवसेनाही त्या परिसरात मजबूत केली. साखर, कांदे-बटाटे, तेल यांची जेव्हा टंचाई आणि महागाई झाली, तेव्हा ती दूर करण्यासाठी आणि या वस्तू जनतेला स्वस्तात उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी अत्यंत प्रभावी कार्य केले.
सॅटीस प्रकल्प, रस्त्यांचे काँक्रिटीकरण आणि रुंदीकरण, सिव्हील हॉस्पिटल आणि शिवाजी हॉस्पिटल यांचे आधुनिकीकरण, घोडबंदरचे मिनी स्टेडियम आणि नाटय़गृह उभारणो, 1क्क् एमएलडीची पाणीपुरवठा योजना साकारणो, यात त्यांचा सिंहाचा वाटा होता.