शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

'...तर अबू आझमी जिंकले नसते, हे त्यांनाही माहितीये'; संजय राऊतांनी सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2024 11:23 IST

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या भूमिकेवर आक्षेप घेत समाजवादी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी यांनी टीका केली. त्यानंतर महाविकास आघाडीत कलगीतुरा रंगला आहे. 

Maha Vikas Aghadi Maharashtra News: महाविकास आघाडीत खटके उडताना दिसत आहे. समाजवादी पार्टीने थेट उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका करत आम्ही भूमिकेशी जुळवून घेणार नाही, असे सपाचे प्रदेशाध्यक्ष अबू आझमी म्हणाले. त्यानंतर समाजवादी पार्टीचे नेते शिवसेनेवर टीका करत आहेत. त्यावर आता बोलताना संजय राऊत यांनी उत्तर दिले.   संजय राऊत म्हणाले, "आम्ही त्याच्यावर अखिलेश यादवजी आहेत, समाजवादी पार्टीचे प्रमुख; त्यांच्याशी चर्चा करून यातून काय मार्ग काढता येईल हे आम्ही पाहत आहोत. खरं म्हणजे गेली अनेक वर्ष समाजवादी पार्टी आमच्यासोबत आहे."

त्यांची मते कोणत्या टीमला गेली?

"त्यांनी आम्हाला सरकार स्थापनेसाठी मदत केली. फक्त जेव्हा विधान परिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकांत मतदान करण्याची वेळ आली. तेव्हा त्यांची मते आम्हाला मिळाली नाहीत. ती कोणत्या टीमला गेलीत आम्हाला माहिती नाही", असा चिमटा संजय राऊतांनी समाजवादी पार्टीला काढला. 

"आताही समाजवादी पार्टीचे प्रमुख अबू आझमी यांच्या प्रचाराला मी स्वतः गेलो होतो. मानखुर्दला जाहीर सभा घेण्यासाठी आणि हे आमचे उमेदवार निवडून यावेत म्हणून मी स्वतः गेलो होतो. इतकंच नव्हे तर मानखुर्दला शिवसेनेचा उमेदवार उभा करा म्हणून आमच्यावर दबाव होता", असे संजय राऊत म्हणाले.  

"...म्हणून ठाकरेंनी आझमीविरोधात उमेदवार दिला नाही" 

"उद्धव ठाकरेंनी हा निर्णय घेतला की, समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतील आपला मित्रपक्ष आहे. अबू आझमी त्या पक्षाचे महाराष्ट्राचे प्रमुख आहेत. त्यांच्यासमोर शिवसेनेचा उमेदवार टाकणं म्हणजे आघाडी धर्म न पाळल्यासारखं होईल ही उद्धव ठाकरेंची भूमिका होती. त्यामुळे आम्ही मानखुर्द भिवंडी भागात रईस शेख यांच्याविरोधात शिवसेनेने उमेदवार उभे केले नाहीत. जर आम्ही उमेदवार उभा केला असता, तर अबू आझमी विजयी होऊ शकले नसते; हे त्यांनाही माहिती आहे", असे संजय राऊत म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Mahavikas Aghadiमहाविकास आघाडीSanjay Rautसंजय राऊतAbu Azmiअबू आझमीShiv Senaशिवसेना