विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ऑफर आली होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2020 05:59 AM2020-05-12T05:59:01+5:302020-05-12T05:59:20+5:30

याच विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी आॅफर आली होती आणि भाजपचे ६ ते ७ आमदार मला स्वत: क्रॉस वोटिंग करणार होते.

There was an offer from the Congress for the Legislative Council - Eknath Khadse | विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ऑफर आली होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

विधानपरिषदेसाठी काँग्रेसकडून ऑफर आली होती, एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट

Next

मुक्ताईनगर (जि. जळगाव) : पंतप्रधान मोदींना शिव्या घालणाऱ्या गोपीचंद पडवळकर यांना विधान परिषदेची उमेदवारी दिली, अशी जाहीर खंत व्यक्त करणाºया एकनाथ खडसे यांनी याच विधानपरिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून मला सहाव्या जागेसाठी आॅफर आली होती आणि भाजपचे ६ ते ७ आमदार मला स्वत: क्रॉस वोटिंग करणार होते. त्यांनी स्वत: माझ्याकडे असे मान्य केले होते, असा गौप्यस्फोट सोमवारी केला.
विधानपरिषद निवडणुकीसाठी आश्वासन देऊनही दगाफटका झाला, त्याचे वाईट वाटत नाही. परंतु निष्ठावंतांना डावलले याची खंत आहे. भाजपने तिकीट कापल्यानंतर राज्यभरातील कार्यकर्त्यांचा दबाव वाढत आहे. निर्णय तर घ्यावा लागेल परंतु कोरोना संकटसमयी राजकारण करणे ठीक नाही. त्यामुळे मी आॅफर मान्य केली नाही, असेही ते म्हणाले.

Web Title: There was an offer from the Congress for the Legislative Council - Eknath Khadse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.