शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

शेतात जाण्याच्या रस्त्यावर अतिक्रमण झाले...

By प्रगती पाटील | Updated: November 5, 2024 10:39 IST

Agriculture News: शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी, यंत्रसामग्री शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी शेतीला सर्व ऋतूत व बारमाही शेत रस्त्यांची आवश्यकता असते. शेत रस्ते, शिव रस्ते, पाणंद रस्ते व पाऊल रस्ते प्रामुख्याने शेतीमधील कामाकरिता उपयोगात येतात. हे सर्व रस्ते सुयोग्य आणि व्यवस्थित असणे आवश्यक आणि गरजेचे आहे.

 - प्रगती जाधव-पाटील (उपसंपादक, लोकमत, सातारा)

पाणंद रस्ता पटवारी रेकाॅर्डवर आहे; पण त्यावरील अतिक्रमण कसे काढावे?- प्रा. विलास डोईफोडे, सावनेरशेतकऱ्यांसाठी आपल्या शेतात जाण्यासाठी, येण्यासाठी शेत रस्ता, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, पाऊल रस्ते अत्यंत महत्त्वाचे असतात. शेतीमध्ये पेरणी, पाळी, नांगरणी, आंतरमशागत, कापणी, मळणी अशी कामे यंत्रामार्फत केली जातात. शेतीमाल बाजारात पोहोचविण्यासाठी, यंत्रसामग्री शेतीपर्यंत पोहोचण्यासाठी शेतीला सर्व ऋतूत व बारमाही शेत रस्त्यांची आवश्यकता असते. शेत रस्ते, शिव रस्ते, पाणंद रस्ते व पाऊल रस्ते प्रामुख्याने शेतीमधील कामाकरिता उपयोगात येतात. हे सर्व रस्ते सुयोग्य आणि व्यवस्थित असणे आवश्यक आणि गरजेचे आहे. परंतु, असे रस्ते पावसाळ्यात चिखल-पाण्यामुळे तर काही वेळा शेजारच्या शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणामुळे निरुपयोगी ठरतात.

शेत रस्ते, पाणंद रस्ते, गाडी मार्ग, शिव रस्ते आणि पाऊल रस्त्यांच्या हक्काबाबत शेतकऱ्यांमध्ये वाद-विवाद निर्माण झाल्यास त्याबाबत चौकशी करून योग्य तो आदेश आणि निर्णय देण्याचे अधिकार महाराष्ट्रातील विविध कायद्यांद्वारे सरकारी यंत्रणेस प्राप्त होतात. याविषयी ‘लोकमत’शी बोलताना महसूल विभागाचा अभ्यास असणारे अजिंक्य कदम म्हणाले, महाराष्ट्र जमीन महसूल कायदा १९६६ मधील कलम १४३ अन्वये तहसीलदारांना कायदेशीर अधिकार आहेत. अशा शेतावर जाण्याच्या मार्गाचे हक्काबाबत वाद निर्माण झाल्यास तहसीलदार यांच्याकडे अर्ज करून दाद मागता येते. 

वहिवाटीच्या रस्त्यांची अडवणूक केली असल्यास मामलेदार न्यायालय कायदा १९०६ चे कलम ५ अन्वये तहसीलदारांना हा रस्ता मोकळा करून देण्याचे अधिकार आहेत. ग्रामीण रस्त्यांची देखभाल आणि परीरक्षणचे कामे हे जिल्हा परिषदेकडून केले जाते. हद्दीचे रस्ते अर्थात पाणंद वगैरे यांची देखभाल व परीरक्षण ही कामे ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत येतात. जिल्हा परिषद व ग्रामपंचायत रस्त्यावरील अतिक्रमण काढून टाकण्याचे अधिकार मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५३ (२) अन्वये ग्रामपंचायतीला प्रदान केले आहेत.

(सरकारी कार्यालयांशी संबंधित अडचणी / प्रश्न पाठवण्यासाठी ईमेल पत्ता : asezaletar@gmail.com)

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीMaharashtraमहाराष्ट्र