शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

Sharad Pawar Sanjay Raut: "भाकरी फिरवण्याचे संकेत होते, पण..."; शरद पवारांच्या निवृत्तीनंतर संजय राऊतांचे एका वाक्यात रोखठोक ट्विट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2023 14:26 IST

Sharad Pawar retirement Sanjay Raut: अजित पवार वगळता राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची पवारांना निर्णय मागे घेण्याची गळ

Sanjay Raut on Sharad Pawar retirement: राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदावरुन निवृत्ती घेत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले. मुंबईतील वाय बी चव्हाण सेंटरमध्ये 'लोक माझे सांगाती' या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. त्यावेळी त्यांनी या घोषणेनंतर उपस्थित कार्यकर्त्यांकडून पवारांच्या निर्णयाला तीव्र विरोध होत आहे. तसेच, तुमच्या नेतृत्त्वाशिवाय पक्ष नाही, असे म्हणत नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. अजित पवार वगळता राष्ट्रवादीच्या सर्व कार्यकर्त्यांची पवारांना निर्णय मागे घेण्याची गळ घातली. तशातच शिवसेना उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत रोखठोक प्रतिक्रिया दिली.

याशिवाय, शरद पवारांच्या घोषणेनंतर पक्षाचे अनेक नेते-पदाधिकारी मंचावर गेले आणि शरद पवारांना आपला निर्णय मागे घेण्याची विनंती केली. यावेळी अनेक कार्यकर्ते भावूक झाले, काहींना अश्रू अनावर झाले. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अश्रू अनावर झाले. त्यांनी यावेळी तुमच्यामुळे आम्ही आहोत आणि पक्ष आहे, अशी भावना व्यक्त केली. आमदार धनंजय मुंडे यांनी तर पवारांचे पायही धरले. तर, प्रफुल्ल पटेल यांनीही, या निर्णयाची कल्पना नव्हती, असे म्हटले आहे. आता, संजय राऊत यांनी यावर भाष्य करताना दिवंगत नेते बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला आहे.

गलिच्छ राजकारण आणि आरोप-प्रत्यारोपांना कंटाळून शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही शिवसेनाप्रमुखपदाचा राजीनामा दिला होता. इतिहासाची पुनरावृत्ती होताना दिसत आहे... पण शिवसैनिकांच्या प्रेमापोटी त्यांना आपला निर्णय मागे घ्यावा लागला. बाळासाहेबांप्रमाणेच पवारसाहेबही राज्याच्या राजकारणाचा आत्मा आहेत... असे संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसेच, बाळासाहेबांप्रमाणेच शरद पवार हेही आपला निर्णय मागे घेतील, असे त्यांनी सूचवलं आहे. 

साहेबांनी विश्वासात न घेता निर्णय घेतला

पवार साहेबांच्या निर्णयामुळे आपल्या सगळ्यांच्या भावना अतिशय ज्वलंत झाल्या आहेत. तुम्ही जसे स्तब्ध झाला, तसेच आम्हीदेखील आहोत. साहेबांनी कुणालाही विश्वासात न घेता हा निर्णय घेतला आहे. तुमच्यासारखीच भावना आमचीही आहे. तुमच्या वतीने आम्हीही साहेबांना हात जोडून हा निर्णय मागे घेण्याची विनंती केली आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSanjay Rautसंजय राऊतAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस