LMOTY 2019 : राफेलमध्ये काहीच भानगड नाही; उद्योजक बाबा कल्याणी यांचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2019 15:24 IST2019-02-20T21:10:53+5:302019-02-21T15:24:10+5:30
लोकमततर्फे बाबा कल्याणी यांना उद्योजकता पुरस्कार देण्यात आला.

LMOTY 2019 : राफेलमध्ये काहीच भानगड नाही; उद्योजक बाबा कल्याणी यांचा खुलासा
मुंबई : भारतात संरक्षण सामुग्री बनविली जात नाही याचे कारण म्हणजे परदेशातून आणलेली वस्तू चांगली अशी वृत्ती असल्याचे शल्य उद्योजक आणि कल्याणी-भारत फोर्जचे संचालक बाबा कल्याणी यांनी बोलून दाखविले. याचबरोबर राफेल विमान खरेदीमध्ये काहीच भानगड नसल्याचे स्पष्ट केले.
लोकमततर्फे बाबा कल्याणी यांना उद्योजकता पुरस्कार देण्यात आला. बाबा कल्याणी यांची लोकमत महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्कार वितरण सोहळ्यावेळी लोकमतचे संपादक विजय बाविस्कर यांनी मुलाखत घेतली. यावेळी कल्याणी यांनी राफेल डीलवर भाष्य केले.
गेल्या ३५ वर्षांत भारत साधी तोफ बनवू शकला नाही. तोफ ही फोर्जिंगपासून बनते. आमचे ते कामच आहे. यामुळे आम्ही ७ वर्षांपूर्वी तोफ बनवायला घेतली. आज ती तोफ लष्कराच्या चाचणीसाठी वापरली जात आहे. महत्वाचे म्हणजे ही तोफ तब्बल ४८ किमी लांबीवर तोफगोळे डागत असल्याचे कल्याणी यांनी सांगितले.
यानंतर बाविस्कर यांनी राफेलमध्ये काही गडबड आहे, का असे विचारल्यावर व्यासपीठावर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पाहून नंतर राफेलमध्ये काहीच गडबड नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच त्या कंपनीला काही उत्पादने बाहेर विकण्याची मुभा असते. ती कशी अमलात आणावी ते त्यांनी ठरवायचे असते, यामुळे राफेलमध्ये काही गडबड नसल्याचे आपल्याला वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.