मराठा आरक्षणाला कोणताही धोका नाही
By Admin | Updated: June 26, 2014 23:46 IST2014-06-26T23:46:03+5:302014-06-26T23:46:03+5:30
मराठा आरक्षणाला कोणताही धोका नसल्याची ग्वाही सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी गुरुवारी येथे दिली.

मराठा आरक्षणाला कोणताही धोका नाही
>कोल्हापूर/मुंबई : मराठा आरक्षणाला कोणताही धोका नसल्याची ग्वाही सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे यांनी गुरुवारी येथे दिली. छत्रपती शाहू सांस्कृतिक मंदिरात सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभागातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्काराचा वितरण सोहळा झाला. त्या वेळी ते बोलत होते.
शिवाजीराव मोघे यांच्या हस्ते 55 व्यक्ती व 1क् संस्थांना या पुरस्काराने गौरविण्यात आले. शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, सन्मानपत्र व व्यक्तींसाठी रोख 15 हजार रुपये व संस्थेसाठी 25 हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हे शपथविधी समारंभामुळे अनुपस्थित राहिले. त्यांच्याच हस्ते पुरस्कार वितरण होणार होते. समारंभानंतर मोघे यांनी पत्रकारांशी बोलताना आरक्षणाबाबत अधिक स्पष्टीकरण दिले.
ते म्हणाले, राज्य सरकारने बुधवारी मराठा व मुस्लीम समाजास आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यावर आता हे आरक्षण टिकेल की नाही, अशी चर्चा सुरू झाली आहे; परंतु ती निराधार असून, राज्य शासनाने त्यासंबंधीचा आवश्यक तो कायदेशीर अभ्यास करूनच तसेच इतर राज्यांतील आरक्षणाची माहिती घेऊनच हा निर्णय घेतला आहे. सध्याच्या विविध जाती समूहांसाठी असलेल्या 52 टक्के आरक्षणाशिवाय हे वेगळे आरक्षण दिले आहे. सच्चर आयोगाच्या शिफारशीवरून मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला, असे ते म्हणाले.
सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही अध्यक्षस्थानावरून बोलताना मराठा आरक्षणाबद्दल असेच स्पष्टीकरण केले. ते म्हणाले, मागासवर्गीय, इतर मागासवर्गीय व विशेष मागास प्रवर्गाच्या विविध योजनांसाठी सामाजिक विभागाला 11 हजार कोटी शासनाने दिले आहेत. आतार्पयत 35क् जातींना इतर मागास प्रवर्गामध्ये घेऊन आरक्षण देण्यात आले आहे. त्याचबरोबर 52 टक्के आरक्षण हे लोकसंख्येच्या आधारावर दिले आहे. मराठा व मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला. हे आरक्षण देताना इतर कुठल्याही जातीच्या आरक्षणाला धक्का लावण्यात आलेला नाही.
यावेळी पालकमंत्री हर्षवर्धन पाटील, कामगारमंत्री हसन मुश्रीफ, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री संजय सावकारे, खासदार धनंजय महाडिक आदी मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)
समाजभूषण पुरस्कार मिळालेल्या संस्था
दीनबंधू शिक्षण सामाजिक संस्था, यवतमाळ, महात्मा शिक्षण संस्था, बोराटवाडी (ता. माण), जिल्हा सातारा, लोकपंचायत तुलसी कॉम्प्लेक्स कुरण रोड, नाटकी संगमनेर, अहमदनगर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे प्रतिष्ठान, अहमदनगर (ता. अकोले), बाल विद्यामंदिर शिक्षण संस्था, नानल पेठ, परभणी, संत गाडगेबाबा बहुउद्देशीय संस्था टीचर्स कॉलनी, पारस (ता. बाळापूर) अकोला, कै. मुंजाजीराव शिक्षण प्रसारक मंडळ, सिडको, औरंगाबाद, महर्षी मरकडेय मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्था, अकोला, लोकसेवा शिक्षण प्रसारक मंडळ उमरखेड, जिल्हा यवतमाळ, विदर्भ विकास महिला बाल कल्याण शिक्षण संस्था, अकोला
अपंगांबरोबर विवाह करणा:या सुदृढ व्यक्तींना 5क् हजार रुपये देण्याची योजना पालकमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी जाहीर केली. याचबरोबर सर्व महामंडळांत अपंग महामंडळाची रिकव्हरी 9क् टक्के इतकी
सर्वाधिक असल्याचे कौतुकही केले.
समाजभूषण पुरस्कार मिळालेल्या व्यक्ती
अनिल संभाजी वाघमारे, रामचंद्र बापू भंडारे, अण्णा नथ्थुजी थोरात, मदन हरिभाऊ मनवर, राजू सोनपाल सरकनिया, भीमसेन कृष्णा देठे, अरुण तातू वाघमारे, कारभारी महिपती घेगडमल, मधुकर वैजू कांबळे (सर्व रा. मुंबई), रघुनाथ बापू देशमुख, राजू शंकर तेलकर, शशिकांत वसंत सूर्यवंशी (सर्व रा. ठाणो), प्रदीप सावळाराम कीर्तने (रायगड), डॉ. दादाराव उकंडराव खडसे (रत्नागिरी), विलास मारुती वनशिव, भिकाचंद दादूराम मेमजादे, महादेव दादू मिसाळ, बाळासाहेब बापूराव हजारे, गोविंद रामचंद्र निंबाळकर (सर्व रा. पुणो), सुरेश बापूराव येवले (सातारा), खाशाबा दादू पाटील, सज्रेराव खाशेराव पवार, संपतराव बापू पवार (सर्व सांगली), अशोक अण्णाराव लामतुरे, नवनाथ निवृत्ती चांदणो, हणमंत भगवान मोरे (सर्व रा. सोलापूर), भगवान मायाप्पा माने, निरंजन विठ्ठल कदम (सर्व कोल्हापूर), पद्माकर पुंजाजी पाटील (नाशिक), चंद्रकांत बाबूराव सेंदाणो (धुळे), अरुण शिवप्रकाश चांगरे (जळगाव), साई प्रकाश जगधनी (अहमदनगर), लक्ष्मणराव गंगाराम वाघमारे (उस्मानाबाद), व्ही. एन. निसर्गन, उत्तम निवृत्ती पवार (सर्व रा. बीड), नारायण दौलतराव चाटे (लातूर), गोविंद मनोबा शिंदे (जालना), उत्तमराव अच्युतराव देशमुख (अमरावती), बाबूराव चिंतामणी रंगारी, प्रकाश उत्तमराव गवळीकर, प्रा. हरिश्चंद्र भेले (सर्व यवतमाळ), भगवान मिराजी पिसोळे (वाशिम), मधुकर पांडुरंग वानेडकर (अकोला), मंदाताई जी. वैरागडे, भिकुनी विशाखा कुशीगर, शब्बीर अली नियाज अली सय्यद (जळगाव), तेजलाल हुकूमचंद अग्रवाल (अमरावती), बबन ज्ञानू मोरे, वसंत आनंदराव कांबळे (मुंबई), जयप्रकाश हरिराम भवसागर (भंडारा), बाळासाहेब हरी गायकवाड, श्रीमती सखुबाई वाघमारे (सोलापूर), प्रताप ऊर्फ बाळासाहेब धोंडिबा पाटील (सांगली), स्मिता ठाकरे (चंद्रपूर), रमेशराव माटे (नागपूर), माया घोरपडे (लातूर).