कल्याणमधील चार युवकांचा थांगपत्ता नाही
By Admin | Updated: July 15, 2014 03:15 IST2014-07-15T03:15:27+5:302014-07-15T03:15:27+5:30
मे महिन्यात बेपत्ता झालेल्या कल्याणमधील आरीफ एजाज अहमद, अमन तांडेल, सलीम तानकी, फहद शेख या मुलांचा तपास अद्याप लागलेला नाही

कल्याणमधील चार युवकांचा थांगपत्ता नाही
कल्याण : मे महिन्यात बेपत्ता झालेल्या कल्याणमधील आरीफ एजाज अहमद, अमन तांडेल, सलीम तानकी, फहद शेख या मुलांचा तपास अद्याप लागलेला नाही. बाजारपेठ पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांचे प्रयत्न सुरू असल्याची माहिती कल्याण विभागीय पोलीस आयुक्त शरद शेलार यांनी दिली.
त्या मुलांचे नेमके काय झाले, याबाबत घरच्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी बोलण्यास स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यानुसार पोलिसांशीही चर्चा केली असता, या बाबतचा तपास एटीएसकडे वर्ग
केला नसल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले.
प्राथमिक माहितीनुसार ही मुले परदेशी गेली असण्याचीही शक्यता आहे. ही सर्व मुले कल्याणमधील दूधनाका परिसरातील राहणारी असून, त्यातील एक युवक २४ तर अन्य तिघे २६, २७ मे रोजी बेपत्ता झाल्याची नोंद कल्याणच्या बाजारपेठ पोलीस ठाण्यात केल्याची माहिती या पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक
एम. के. तायडे यांनी ‘लोकमत’ला दिली.
ही मुले २२ ते २६ या वयोगटातील असून ती विशिष्ट दिवसांमध्ये बेपत्ता झाली आहेत. त्यांच्या मित्रांसह नातेवाईक व अन्य ठिकाणी हा तपास सुरू आहे. पोलीस यंत्रणेचे काम सुरू असून, ज्या अधिकाऱ्याकडे हा तपास देण्यात आला आहे ते जाधव रजेवर आहेत. त्यामुळे या बाबतची अधिकची माहिती देता येत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. (प्रतिनिधी)