शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

उत्पन्नाचा दाखल दरवर्षी सादर करण्याची गरज नाही

By admin | Updated: July 11, 2014 01:25 IST

मागासवर्गीय गटातील मुलांना शैक्षणिक शुल्काच्या सवलतीसाठी आता दरवर्षी उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. प्रवेश घेतेवेळी उत्पन्न जर ४.५ लाखाच्या खाली असेल तर एकदा

नागपूर: मागासवर्गीय गटातील मुलांना शैक्षणिक शुल्काच्या सवलतीसाठी आता दरवर्षी उत्पन्नाचे प्रमाणपत्र सादर करण्याची गरज नाही. प्रवेश घेतेवेळी उत्पन्न जर ४.५ लाखाच्या खाली असेल तर एकदा प्रमाणपत्र दाखल केले तर तेच शेवटपर्यंत ग्राह्य धरले जाईल, असे सामाजिक न्यायखात्याचे मंत्री शिवाजीराव मोघे यांनी येथे सांगितले.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. सामाजिक न्याय खात्याने घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयापैकी हा एक निर्णय असून त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. राज्यातील शासनमान्य खासगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शिक्षण संस्थामध्ये व्यावसायिक अभ्यासक्रमात प्रवेश घेतलेल्या अनुसूचित जाती, विमुक्त जमाती, भटक्या जमाती, विशेष मागासप्रवर्ग व इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी उत्पन्न मर्यादा ४.५ लाख रुपये आहे. पूर्वी विद्यार्थ्यांने पाच वर्षाच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर दरवर्षी त्याला उत्पन्नाचा दाखला संबंधित महाविद्यालयात सादर करावा लागत होता. त्यामुळे विद्यार्थ्यांचीही गैरसोय होत होती आणि संभ्रमही वाढला होता. आता शासनाने यात सुधारणा केली आहे. प्रवेश घेतेवेळी जर उत्पन्न शासनाने ठरवून दिलेल्या मर्यादेत असेल तर पहिल्यावर्षी दाखल केलेला दाखलाच शेवटपर्यंत चालेल, असे मोघे यांनी यावेळी स्पष्ट केले.ओबीसी व भटक्या विमुक्त जमातीसाठी उत्पन्नाची मर्यादा सहा लाख रुपये करण्याची मागणी आहे. महाविद्यालयीन प्रवेशासाठी ही मर्यादा सहा लाख रुपयेच आहे. मात्र शैक्षणिक शुल्क प्रतिपूर्तीसाठी ती साडेचार लाख रुपये आहे. ती जर सहा लाख रुपये केली तर त्याचा फायदा गरीब श्ोतकरी व इतर दुर्बल घटकातील नागरिकांना मिळणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)ओबीसींना १४०० कोटींचे वाटपइतर मागासवर्गीय व भटक्या जमातीतील विद्यार्थ्यांना शासनातर्फे दरवर्षी १४०० कोटी रुपये शिष्यवृत्तीसाठी वाटप केले जाते. देशात इतक्या मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्तीसाठी निधी देणारे महाराष्ट्र हे एक राज्य आहे. केंद्र शासन त्यांच्या वाट्याची रक्कम देत नाही आणि दिली तरी ती अत्यल्प असते. मात्र राज्य शासन स्वत:च्या तिजोरीतून ही रक्कम देते याकडे मोघे यांनी लक्ष वेधले. केंद्राकडे यंदा १०७ कोटी रुपये वाटप करायचे आहेत. त्यासाठी अर्थसंकल्पात १६६० कोटींची तरतूद करण्यात आली आहे.