आॅडिटशिवाय मेट्रो भाडेवाढ नाही

By Admin | Updated: August 11, 2015 04:44 IST2015-08-11T04:44:47+5:302015-08-11T04:44:47+5:30

मुंबईतील मेट्रो रेल्वेचे विशेष आॅडिटिंग केल्यानंतरच भाडेवाढीबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

There is no Metro hike without the audit | आॅडिटशिवाय मेट्रो भाडेवाढ नाही

आॅडिटशिवाय मेट्रो भाडेवाढ नाही

मुंबई : मुंबईतील मेट्रो रेल्वेचे विशेष आॅडिटिंग केल्यानंतरच भाडेवाढीबाबत विचार केला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
मंत्रालयात पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सरकारने भाडेनिश्चिती समिती नेमली होती. या समितीने १० रुपये ते ११० रुपयांपर्यंतची भाडेवाढ करण्याची शिफारस केली होती. सर्वोच्च न्यायालयाने त्यास गेल्या आठवड्यात हिरवा झेंडाही दाखविला होता. पण अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही.
रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमध्ये शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासंदर्भात प्रतिक्रिया विचारली असता ते म्हणाले की, ती एक स्वायत्त संस्था आहे. राष्ट्रवादी आणि मनसेचे नेते, कार्यकर्ते यांनीही त्या ठिकाणी आधी प्रशिक्षण घेतलेले आहे. (विशेष प्रतिनिधी)

मेट्रोचा एकूण खर्च, उत्पन्न याचा ताळमेळ, त्यातून मेट्रोला होणारा फायदा, प्रवाशांवर पडणारा भार, निविदा करारातील अटी, शर्थी या सर्व बाबी तपासून घेतल्या जातील.
- मुख्यमंत्री

Web Title: There is no Metro hike without the audit