शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
2
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
3
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
4
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
5
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
6
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
7
गाळ काढताना विहिरीत हाती लागली ‘गधेगळ’, चौदाव्या शतकातील ऐतिहासिक ठेवा जोपासणार
8
मृत्युनंतर महिलेच्या मालमत्तेवर कुणाचा हक्क? माहेर की सासर? हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय!
9
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
10
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
11
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
12
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
13
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
14
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
15
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
17
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
18
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
19
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
20
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
Daily Top 2Weekly Top 5

साखर उद्योगावर कृपादृष्टी नाहीच!

By admin | Updated: March 1, 2015 02:31 IST

राज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसबिलापोटी देय असलेले सुमारे ३२०० कोटी रुपये थकीत राहण्याचा धोका वाढला आहे.

विश्वास पाटील- कोल्हापूरराज्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे ऊसबिलापोटी देय असलेले सुमारे ३२०० कोटी रुपये थकीत राहण्याचा धोका वाढला आहे. ही संपूर्ण रक्कम किमान आणि वाजवी मूल्यातील (एफआरपी) आहे. केंद्र शासन कारखानदारीस काही ना काही मदत करील, अशी आशा होती; परंतु शनिवारी मांडलेल्या अर्थसंकल्पात साखर उद्योगाचा अर्थमंत्र्यांनी साधा उल्लेखही केला नसल्याने केंद्राचे पॅकेज मिळण्याची शक्यता कमीच आहे.हंगाम सुरू झाल्यापासूनच कारखानदारी केंद्र शासनाच्या मदतीकडे डोळे लावून बसली आहे. यापूर्वी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांची साखर उद्योगप्रश्नी शिष्टमंडळाने भेट घेतली तेव्हा त्यांनी २१ जानेवारीपर्यंत काहीतरी मदत करण्याचे आश्वासन दिले होते; परंतु त्याला महिना उलटून गेला. अर्थमंत्री किमान अर्थसंकल्पात तरी या पॅकेजची घोषणा करतील, या आशेने कारखानदारीचे अर्थसंकल्पाकडे डोळे लागले होते; परंतु तिथेही भ्रमनिरास झाला. राज्यात यंदा ८ कोटी टन गाळप होण्याचा अंदाज आहे. त्यातील १ कोटी १० लाख टन कोल्हापूर-सांगली जिल्ह्यांतील आहे. याच विभागातील कारखान्यांनी ‘एफआरपी’प्रमाणे बिले दिली आहेत; परंतु त्यांचे शेवटच्या दीड महिन्यातील टनास किमान ४०० रुपये थकीत राहतील. राज्यातील उर्वरित कारखान्यांची ‘एफआरपी’तील टनास तेवढीच थकबाकी राहिली तरी ही एकत्रित रक्कम ३२०० कोटी रुपयांपर्यंत जाते. २ हजार कोटी थकबाकी असल्याचे साखर आयुक्तांनीच परवा जाहीर केले आहे. ही रक्कम द्यायची कशातून, हा कारखानदारीपुढे प्रश्न आहे. मूल्यांकन कमीराज्य बँकेने साखरेच्या पोत्याचे मूल्यांकनही १०० रुपयांनी कमी केले आहे. गेल्या महिन्यात ते २४३० रुपये होते. आता ते २३३० रुपये झाल्याने कारखान्यांना आणखी १०० रुपये कमी मिळतील. दुष्काळात धोंडा महिना असल्यासारखी स्थिती उद्भवली आहे.शब्दांचे नुसतेच बुडबुडे शनिवारी मांडण्यात आलेले बजेट म्हणजे शब्दांचेच नुसते बुडबुडे आहेत़ गरिबांसाठी पेन्शन व विमा योजना हीच काय ती या अर्थसंकल्पातील चांगली बाजू आहे़ यापूर्वीच्या सरकारने शेती,साखर कारखानदारी, सिंचन आदींसाठी फारसे लक्ष दिले नाही म्हणून नव्या सरकारकडून याबाबत अपेक्षा होत्या. मात्र, त्या अपूर्ण आहेत़ अर्थसंकल्पात सिंचनासाठी ५३०० कोटी रुपयांची तरतूद आहे. परंतु ती अत्यंंत अपुरी आहे. - राजू शेट्टी, खासदार हजारो कोटी रुपये करांच्या माध्यमातून उत्पन्न देणारा हा देशातील दुसऱ्या क्रमाकांचा उद्योग भाजपा सरकारला कळलेलाच नाही, असे दुर्दैवाने म्हणावे लागते. हा उद्योग कसा मोडीत निघेल, अशीच धोरणे केंद्र सरकार राबवीत असून, त्याचा महाराष्ट्राच्या अर्थकारणावर दूरगामी परिणाम होईल. - पी. जी. मेढे, साखर उद्योगाचे अभ्यासक