आघाडी होण्याची शक्यता नाही - प्रफुल्ल पटेल

By Admin | Updated: January 20, 2017 20:50 IST2017-01-20T20:50:18+5:302017-01-20T20:50:18+5:30

राज्यात महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईल, असे वाटत नाही. आमच्याकडून प्रयत्न झाले.

There is no chance of a lead - Praful Patel | आघाडी होण्याची शक्यता नाही - प्रफुल्ल पटेल

आघाडी होण्याची शक्यता नाही - प्रफुल्ल पटेल

>ऑनलाइन लोकमत
नागपूर, दि. 20 - राज्यात महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होईल, असे वाटत नाही. आमच्याकडून प्रयत्न झाले. पण काँग्रेस नेत्यांनी सकारात्मकता दाखलविली नाही. त्यामुळे आता आघाडी होणे शक्य वाटत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केले. 
नागपुरात पत्रकारांशी बोलताना पटेल म्हणाले, आघाडी संदर्भात  स्थानिक नेत्यांना  निर्णय घेण्याबाबत सांगितले होते. मात्र, स्थानिक नेत्यांनीही विरोध दर्शविला. काँग्रेसनेही सकारात्मक भूमिका घेतली नाही. त्यामुळे राज्यातील सर्व मनपा व जि.प. निवडणुकीत आघाडी होण्याची शक्यता वाटत नाही. राष्ट्रवादीतर्फे लवकरच मुंबई महापालिकेच्या सर्व जागा जाहीर केल्या जातील, असेही त्यांनी सांगितले. आघाडीत बिघाडीसाठी कोणते नेते जबाबदार वाटतात, या प्रश्नावर त्यांनी थेट उत्तर देणे टाळत काँग्रेस नेत्यांवर खापर फोडले. 

Web Title: There is no chance of a lead - Praful Patel