शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून अज्ञात कार घुसली आत, तपास सुरू!
2
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
3
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
4
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
5
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
6
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
7
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
8
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
9
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
10
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
11
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
12
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
13
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
14
Petrol Price In US: ट्रम्प यांच्या निर्णयाचा अमेरिकेच्या लोकांनाच फटका; पेट्रोलच्या दरात जून २०२२ नंतरची सर्वात मोठी वाढ
15
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
16
बंगळुरू-चेन्नई लढतीत पाण्याच्या बाटलीवरून वाद, RCBचा कर्णधार पंचावर भडकला, नेमकं घडलं काय?
17
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
18
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
19
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
20
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
Daily Top 2Weekly Top 5

२२-१८-९ मविआचा फॉर्म्युला? १५ जागांवर अद्यापही तिढा; प्रकाश आंबेडकर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2024 12:43 IST

मविआचं जोवर एकमत होत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागांमधील एखादी जागा आम्ही मागितली तर आम्ही कुणासोबत बोलायचं? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी विचारला.

मुंबई - Prakash Ambedkar on MVA ( Marathi News ) लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील जागावाटप अंतिम टप्प्यात आले आहे. राज्यात प्रमुख नेत्यांच्या बैठकांचा सिलसिला सुरू आहे. अमित शाह यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची बैठक घेतली. तर शरद पवार, उद्धव ठाकरे, प्रकाश आंबेडकर यांच्यातही आज बैठक होत आहे. तत्पूर्वी महाविकास आघाडीच्या जागावाटपावरून तिढा असल्याने प्रकाश आंबेडकरांनी वंचित बहुजन आघाडीचे पत्ते उघड करण्यास नकार दिला आहे. 

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, बैठकीत ज्या जागा सुटतील त्या सुटतील. पण पहिल्यांदा त्यांचा तिढा सुटल्याशिवाय आमच्यासोबतचा तिढा सुटत नाही. माहितीनुसार, २२, १८, ९ असा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला आहे. परंतु त्यातील १५ जागांवर तिढा आहे. तो वाद सुटत नाही तोवर हा आकडा खरा आहे असं मी मानत नाही. त्यामुळे त्यांचं ठरल्यानंतर आम्ही आमचे कार्ड उघड करू असं त्यांनी सांगितले. 

तसेच महाविकास आघाडीची बैठक आहे असं सांगण्यात येतंय, मात्र तसं नाही. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि माझी अशी ही बैठक आहे. मविआमध्ये काही गोष्टींवरून वाद आहे त्याबाबत मला सांगणार आहेत. मविआची जी चर्चा आहे त्याबाबत ठरणार आहे. त्यात वंचित बहुजन आघाडीची भूमिका नाही असं त्यांनी स्पष्ट केले. 

दरम्यान, अद्याप मविआत जागावाटपावरूनच तिढा आहे. १० जागांवर काँग्रेस-शिवसेना यांच्यात चढाओढ आहे. ५ जागा अशा आहेत ज्यावर शिवसेना-काँग्रेस आणि  राष्ट्रवादी यांच्यात ठरणं बाकी आहे. एकंदरीत १५ जागांवर एकमत झालेले नाही. ही आमची माहिती आहे. त्यामुळे मविआचं जोवर एकमत होत नाही तोवर ते आमच्याशी बोलू शकत नाहीत. १५ जागांमधील एखादी जागा आम्ही मागितली तर आम्ही कुणासोबत बोलायचं? हा तिढा त्यांचा आहे. तो तिढा सुटल्याशिवाय आमच्याशी बोलणी होऊ शकत नाही अशी ही परिस्थिती आहे असंही प्रकाश आंबेडकरांनी म्हटलं. 

टॅग्स :Prakash Ambedkarप्रकाश आंबेडकरMahavikas Aghadiमहाविकास आघाडीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४