शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

शिवसेनेकडील उत्पादन शुल्क खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे; शंभुराज देसाई म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 10:53 IST

आमच्या तिन्ही पक्षात कुठलाही रस्सीखेच नाही. प्रत्येकाला पालकमंत्रिपद मिळावं, चांगली खाती मिळावे असं वाटत असते असं त्यांनी सांगितले. 

कोल्हापूर - कुठलेही खाते मोठे किंवा लहान नसते. शिवसेनेच्या कोट्यातली उत्पादन खाते अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेले असले तरी गृहनिर्माण सारखं खाते जे शहरी, ग्रामीण भागातील अत्यंत चांगले खाते आमच्याकडे आले आहे असं सांगत मंत्री शंभुराज देसाई यांनी खातेवाटपावर प्रतिक्रिया दिली आहे. 

पत्रकारांशी बोलताना शंभुराज देसाई म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वप्न आहे प्रत्येक कुटुंबाला, गरिबाला हक्काचं घर मिळालं पाहिजे हे गृहनिर्माण खाते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आलेलं आहे. त्यामुळे जे खाते आहे ते तितक्याच तोलामोलाचं आहे. राज्यात पर्यटनाला खूप क्षमता आहे. कोल्हापूर, कोकण, सातारा यासह राज्यात अनेक पर्यटन स्थळे आहेत. आता लोक पर्यटनाकडे वळायला लागली आहेत. पर्यटनाच्या माध्यमातून इकोनॉमी तयार होत आहे. या अर्थव्यवस्थेला गती देण्याचं काम आम्हाला करायचं आहे असं त्यांनी सांगितले.

तसेच मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसोबतच मी मुंबईला आलो. साहेबांनी येताना विमानात सांगितले आपल्याला चांगले काम करायचं आहे. तुमच्या पर्यटन विभागाला पुरेसा निधी देऊ. त्यामुळे निश्चित पर्यटन खात्यात चांगले काम होईल असंही पर्यटन मंत्री शंभुराज देसाई यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आम्ही निवडून आल्यानंतर आमच्याबाबतीत निर्णय घेण्याचा अधिकार पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिले आहेत. खातेवाटप झाले, विस्तार झाले. अधिवेशन कालच संपलंय. आता मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री २ दिवसात मुंबईत बसतील त्यानंतर पालकमंत्रीही वाटप होईल. २३७ आमदारांचे महायुतीला बहुमत मिळालं आहे. त्यामुळे आमच्या तिन्ही पक्षात कुठलाही रस्सीखेच नाही. प्रत्येकाला पालकमंत्रिपद मिळावं, चांगली खाती मिळावे असं वाटत असते. पण आम्हाला जे काही मिळेल त्यात चांगले काम करून दाखवू असंही मंत्री शंभुराज देसाई यांनी सांगितले.

मुंबई महापालिकेवर आम्ही भगवा फडकवू

उबाठा बॅकफूटवर गेली आहे. शिवसेना नाव आणि धनुष्यबाण हे घटनेने, कायद्याने नियमाने आमच्याकडे आहे. मागच्या निवडणुकीत लागलेला निकाल त्यामुळे उबाठा असेल किंवा अन्य दोघे मविआत एकमेकांवर खापर फोडण्याचं काम सुरू आहे. सभागृहात ५० चाही आकडा नाही. विरोधकांमध्ये एकवाक्यता नाही. तिन्ही पक्ष वेगवेगळी भूमिका मांडायचे. महाविकास आघाडीत एकमेकांवर खापर फोडण्याचं काम सुरू आहे.  त्यांचं त्यांना लखलाभ, जशी एकतर्फी निकाल विधानसभेला लागला तसेच महायुतीचा भगवा झेंडा विधानसभेत तुम्हाला मुंबई महापालिकेवर फडकलेला दिसेल असा विश्वास मंत्री शंभुराज देसाई यांनी व्यक्त केला. 

टॅग्स :Shambhuraj Desaiशंभूराज देसाईMahayutiमहायुतीtourismपर्यटनEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपाAjit Pawarअजित पवार