शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
5
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
6
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
7
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
8
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
9
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
10
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
11
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
12
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
13
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
14
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
15
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
18
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
19
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
20
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
Daily Top 2Weekly Top 5

कोणतीच अडचण नाही, सत्ता लवकरच स्थापन होईल; शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांची भूमिका

By मनोज मुळ्ये | Updated: November 30, 2024 18:14 IST

२०१९ मध्ये तर ३६ दिवस लागले

रत्नागिरी : सत्ता स्थापनेबाबत काेणीही काहीही विधाने करत असले तरी त्यात तथ्य नाही. सत्ता स्थापनेबाबत कोणतीही अडचण नाही. नजीकच्या तीन -चार दिवसांत सत्ता स्थापन होईल, असा दावा आमदार उदय सामंत यांनी केला आहे.दिल्लीमध्ये महायुतीच्या चर्चेप्रसंगी मीही हजर होतो. ही चर्चा सकारात्मक झाली. या चर्चेत काय झाले हे त्याच रात्री दीड-दोन वाजता एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे. त्याबाबत शुक्रवारी मुंबईतील पत्रकार परिषदेतही मी सविस्तर बोललो होतो. आपली भूमिका एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांच्यासमोर ठेवली आहे. आता पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी निर्णय घ्यायचा आहे. जो काही निर्णय घेतील, त्याला शिंदेसेनेचा पूर्ण पाठिंबा असेल. आम्हाला किती जागा हव्या आहेत, याबाबत एकनाथ शिंदे यांनी त्यांच्याशी चर्चा केली आहे. त्यामुळे त्याबाबत निर्णय होऊन लवकरच सत्ता स्थापन होईल याची आपल्याला खात्री आहे, असे सामंत यांनी सांगितले.२००४ पासून प्रत्येकीवेळी सत्ता स्थापन होण्यास वेळ लागला होता. २०१९ मध्ये तर ३६ दिवस लागले. पण त्यावर कोण चर्चा करत नाही. कोणीतरी सकाळी पत्रकार परिषद घेऊन बोलतो आणि त्याबाबत चर्चा केली जाते. निकाल लागून पाच-सहा दिवसच झाले आहेत. जास्त वेळ लागणार नाही. दोन दिवसात सर्व गोष्टी निश्चित होतील, असे ते म्हणाले.भाजपच्या नेता निवडीनंतर लगेचच..भाजपची विधिमंडळ पक्षनेत्याची निवड बाकी आहे. ही निवड झाल्यानंतर लगेचच महायुतीची सत्ता स्थापन होईल, असेही सामंत यांनी सांगितले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४MahayutiमहायुतीUday Samantउदय सामंतChief Ministerमुख्यमंत्रीEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस