शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

देवेंद्र फडणवीसांना पद सोडण्याचा पक्षाचा आदेश नाही

By यदू जोशी | Updated: June 6, 2024 07:25 IST

फडणवीस राजीनाम्यावर पक्षश्रेष्ठींचा आदेश मानणार, त्यांचा प्रस्ताव नाकारा : बावनकुळेंचा दिल्लीत फोन

मुंबई : देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देऊन पक्षसंघटनेत काम करण्याची इच्छा पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार व्यक्त केल्याची चर्चा दिल्लीतील पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने ‘लोकमत’शी बोलताना फेटाळली. आपल्या भूमिकेवर पक्षश्रेष्ठी देतील तो निर्णय आपल्याला मान्य असेल, असे फडणवीस यांनी पक्षातील आपल्या विश्वासू  सहकाऱ्यांना सांगितले आहे.

पक्षश्रेष्ठींकडून त्यांना पद सोडण्याचा आदेश देण्यात आलेला नाही. त्यांनी स्वत:हून तशी भूमिका घेतलेली आहे; पण ती मान्य केली जाण्याची शक्यता नाही, असेही या नेत्याने स्पष्ट केले. खात्रीलायक सूत्रांनी सांगितले की, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी रात्री उशिरा दिल्लीतील पक्षसंघटनेच्या एका अत्यंत महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यास फोन करून फडणवीसांचा प्रस्ताव कोणत्याही परिस्थितीत स्वीकारू नका, अशी विनंती केली. 

दिल्लीतील एका बड्या नेत्याने सांगितले की, इतरही राज्यांत भाजपच्या जागा कमी झाल्या पण तिथल्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शविलेली नाही, पक्षाची ती अपेक्षा नाही. भाजपमध्ये अशी पद्धतही नाही. फडणवीस यांचा प्रस्ताव स्वीकारला तर मग भाजपची कामगिरी खालावलेल्या राज्यांमधील मुख्यमंत्र्यांचेही राजीनामे घ्यावे लागतील, पक्षनेतृत्वाची त्यासाठी तयारी नाही. काही बदल महाराष्ट्रात करायचेच असतील तर ते लगेच केले जाणार नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले. फडणवीस यांना राजीनामा द्यायला पक्षश्रेष्ठींनी सांगितल्याची चर्चा निराधार असल्याचेही या नेत्याने स्पष्ट केले.

महायुतीच्या सरकारमध्ये संतुलनाची महत्त्वाची भूमिका फडणवीस निभावतात. विधानसभा निवडणुकीच्या पाच महिने आधी त्यांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडणे पक्षाला परवडणारे नाही. उलट सरकारमध्ये राहून पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी जोमाने काम करण्यास फडणवीस यांना भाजपच्या पक्षश्रेष्ठींकडून सांगितले जाईल असे सूत्रांनी सांगितले. फडणवीस लवकरच दिल्लीला जाणार असून त्यावेळी पक्षनेतृत्वाकडून त्यांना सरकारमध्येच राहण्याचा आदेश दिला जाईल, असेही विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

आधीही दर्शविली होती तयारी ३० जून २०२२ रोजी नाट्यमय घडामोडी घडल्या होत्या. फडणवीस मुख्यमंत्री होणार हे निश्चित मानले जात असतानाच फडणवीस यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आणि आपण मंत्रिमंडळात नसणार अशी घोषणा पत्र परिषदेत करून धक्का दिला होता. त्यानंतर भाजपच्या आमदारांनी आपण मंत्रिमंडळात राहिलेच पाहिजे, असा आग्रह धरला. काही वेळातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन करून उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याचा आदेश दिला. फडणवीस यांनी त्या आदेशाचे पालन केले.

राजीनाम्यावर ठामफडणवीस यांनी पत्र परिषदेत पद सोडण्याची तयारी दर्शविल्यानंतर लगेच प्रदेशाध्यक्ष बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील आदी त्यांना भाजप कार्यालयातच स्वतंत्रपणे भेटले आणि आपण राजीनामा देण्याची कोणतीही गरज नाही. भाजपच्या दृष्टीने पक्षसंघटना आणि सरकारमध्ये आमचे नेते तुम्हीच आहात असे या नेत्यांनी फडणवीस यांना सांगितले. फडणवीस मात्र राजीनाम्यावर ठाम असून पक्षश्रेंष्ठींचा आदेश आपल्यासाठी अंतिम असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसmaharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४BJPभाजपाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे