शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
3
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
4
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
5
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
6
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
7
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
8
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
9
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
10
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
11
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
12
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
13
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
14
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
15
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
16
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
17
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
18
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
19
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
20
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण

"मग मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विठ्ठलाच्या चरणी कोरोना नष्ट होण्याचे साकडे का घातले?"

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 7:53 AM

जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे का घातले त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय?

मुंबई  - पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप यांना पूर्ण भान आहे की, कोणत्या गोष्टींना महत्त्व द्यायचे व नाही. देशातील कोरोनोचा प्राद्रूर्भाव संपविण्यासाठी सर्वाधिक उपाययोजना पंतप्रधान नरेंद्र मोदी करित आहेत. हे सांगण्यासाठी कोणा ज्योतिषाची आवश्यकता नाही. मंदिर बांधून कोरोना जाणार नाही याचे निश्चित भान त्यांना आहे, परंतु आपल्या देव दैवतांचा आशिर्वाद आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. जर मंदिर बांधून व देवाची उपासना करुन कोरोना जाणार नसेल तर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंढरपूर येथे जाऊन विठ्ठलाच्या चरणी महाराष्ट्रातील नव्हे तर देशभरातील कोरोना जाऊ दे असे साकडे का घातले त्याचे उत्तर आपल्याकडे आहे काय असा सवाल विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रसेचे अध्यक्ष शरद पवार यांना केला आहे. आम्हाला वाटते की कोरोना थांबवला पाहिजे आणि काहींना वाटते की मंदिर बांधून कोरोना जाईल, असा टोला अप्रत्यक्षपणे शरद पवार यांनी मोदी सरकारला सोलापूर येथील दौ-यादरम्यान लगावला आहे. त्यावर भाष्य करताना विरोधी पक्ष नेते दरेकर यांनी सांगितले की, लॉकडाऊनमुळे आर्थिक नुकसान होत असल्याची जाणीव पंतप्रधान मोदी यांना आहे, म्हणूनच या संकटमय परिस्थितीत मोदी यांनी देशासाठी गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून १ लाख ७० हजार कोटीचे पॅकेजचा तात्पुरता दिलासा जनतेला दिल्यानंतर २० लाख कोटीचे आत्मनिर्भर पॅकेज मधून देशाच्या आर्थिक व्यवस्थेला चालना दिली व देशाला आत्मनिर्भर  करण्यासाठी त्यांनी भर दिला, असेही दरेकर यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान मोदी कोरोनाच्या परिस्थितीत पूर्ण संवेदनशील आहेत. पण महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून, येथे कोरोना रोखण्यासाठी योग्य उपाययोजना करण्याची आवश्यकता आहेत, पण दुदैर्वाने त्या होत नाही, म्हणून रोज कोरोनाची परिस्थिती हाताबाहेर जात आहे, याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे. उलटपक्षी विरोधी पक्ष नेते व भाजप जनतेमध्ये जाऊन व सेवाकार्य करुन कोरोनाच्या बाबतीत आपली बांधिलकी सांभाळत आहे, याचेपण भान सर्वांना असले पाहिजे असेही दरेकर यांनी नमुद केले.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेRam Mandirराम मंदिर