शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

"शेवटच्या एका मिनिटात काय घडलं पत्ताच नाही, विमानाचा 'ट्रान्सपॉन्डर'च...!" रोहित पवारांच्या मानात संशयाची पाल चुकचुकली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2026 19:48 IST

काय म्हणाले रोहित पवार? ट्रान्सपॉन्डरचं नेमकं काम काय?

दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आज राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)चे पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत, पीपीटीच्या माध्यमाने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. यावेळी त्यांनी विमानातील ट्रान्सपॉन्डरसंदर्भात भाष्य केले. "कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून बंद केला होता," असा गंभीर आरोप अथवा दावा त्यांनी यावेळी केला. यासंदर्भात बोलताना, "८.४३.१८ वाजता ट्रान्सपॉन्डर हा बंद झाला. का बंद झाला? का कुणी बंद केला?" असे प्रश्न आमदार रोहित पवार यांनी यावेळी उपस्थित केले.

काय म्हणाले रोहित पवार? ट्रान्सपॉन्डरचं नेमकं काम काय? -विमानातील ट्रान्सपॉन्डरसंदर्बात बोलताना रोहित पवार म्हणाले,"विमानाला एक ट्रान्सपॉन्डर (Transponder) असते. विमान सांगत असते सॅटेलाइटच्या माध्यमातून की मी येथे आहे. माझा स्पीड किती आहे? एअरपोर्टचे जे स्टिप आहे, त्याला अलाइन झालोय का? तिथून माझे अंतर किती आहे? मी किती उंचावर आहे? माझे लोकेशन कुठे आहे? हे सर्व तिथं दिलं जातं आणि हे सर्व आमच्याकडे आहे. ही माहिती आम्हाला एका सॉफ्टवेअरच्या माध्यमातून मिळाली." 

"...तर आपल्याला शेवटपर्यंत कळाले असते" -रोहित पवार पुढे म्हणाले, "आम्हाला सर्व माहती समजली, केवळ शेवटच्या एक मिनिटाची माहिती आम्हाला कळली नाही. कदाचित ट्रान्सपॉन्डर हा मुद्दामून विमानाच्या आतून बंद केला होता. तुम्हाला विमान टिल्ट होताना दिसतेय. तेव्हा ट्रान्सपॉन्डर  बंद होता. ८.४३.१८ वाजता ट्रान्सपॉन्डर हा बंद झाला. का बंद झाला? का कुणी बंद केला? असे प्रश्न आम्हाला त्याच्यामध्ये आहेत. नाही तर आपल्याला शेवटपर्यंत कळाले असते." 

याशिवाय, "या एक मिनिटाच्या आधी हे विमान त्या धावपट्टीला अलाइन झाले होते. म्हणजे, ते धावपट्टीवर उतरेल, अशी अपेक्षा होती. पण एका मिनिटामध्ये काहीतरी गडबड झाली, ती अद्यापही आपल्याला समजलेली नाही," असेही रोहित पवार यावेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Rohit Pawar alleges plane's transponder was deliberately switched off before crash.

Web Summary : Rohit Pawar raised concerns about अजित Pawar's plane crash. He alleged the transponder was deliberately shut off a minute before, questioning the reason and timing, which prevented tracking the final moments.
टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारAjit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस