"...तर आम्ही त्याचे समर्थन करू"; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारकडे काय केली मागणी?
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 13:51 IST2025-04-03T13:49:32+5:302025-04-03T13:51:37+5:30
उद्धव ठाकरे यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयावर भूमिका मांडतांना मोदी सरकारकडे एक मागणी केली. ठाकरे काय म्हणाले?

"...तर आम्ही त्याचे समर्थन करू"; उद्धव ठाकरेंनी मोदी सरकारकडे काय केली मागणी?
Uddhav Thackeray Modi Government Tariff: "देशावर संकट घोंगावत आहे. त्यामुळे इतर सगळे विषय बाजूला ठेवून सरकार टॅरिफच्या मुद्द्यावर चर्चा करेल असे मला वाटले होते. ट्रम्प यांनी जो टॅरिफ लागू केला आहे, त्यामुळे आपले नुकसान होत आहे", अशी चिंता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली. यावेळी त्यांनी मोदी सरकारकडे एक मागणी केली आणि सरकारने ही गोष्ट केली तर आम्ही त्याचे समर्थनच करू, असेही ठाकरे म्हणाले.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
उद्धव ठाकरे यांनी मुंबईत पत्रकार परिषदे घेतली. यावेळी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलेल्या टॅरिफच्या धोरणावरही भाष्य केले.
ट्रम्प यांचा टॅरिफ शस्त्र, ठाकरे काय म्हणाले?
टॅरिफच्या मुद्द्याबद्दल प्रश्न विचारल्यानंतर ठाकरे म्हणाले, "हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. माझा आग्रह आहे की, देशाच्या हितासाठी जे करण्याची आवश्यकता आहे. ते करण्याला प्राथमिकता असायला हवी. माजी अपेक्षा होती की, काल इतर सर्व विषय बाजूला ठेवून ट्रम्प यांनी जे टॅरिफ लागू केला आहे. ज्यामुळे आपले नुकसान होत आहे, त्यावर चर्चा करावी."
वाचा >>वक्फ विधेयकाला विरोध नसून त्यातील...; उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल
"काल संपूर्ण चर्चेच्या दरम्यान, अर्थमंत्री होत्या की नव्हत्या माहिती नाही. परराष्ट्र मंत्री दिसले की नाही. पंतप्रधान होते की नाही, पण आज बाकीचे सर्व विषय बाजूला ठेवून राज्यसभा आणि लोकसभेत हे जे संकट आपल्यावर घोंगावत आहे, त्यासाठी आपण काय करणार आहोत, काय करायला पाहिजे; याबद्दल सगळ्यांना माहिती द्यायला पाहिजे", असे उद्धव ठाकरे टॅरिफच्या मुद्द्यावर म्हणाले.
टॅरिफला हिंदू मुस्लीम माहिती नाही -ठाकरे
"मी विश्वास देतो की, देशाच्या हितासाठी तुम्ही काही करू इच्छित असाल... म्हणजे अमेरिकेने असे असे केले आहे आणि आपल्यालाही हे करावे लागेल, तर आम्ही त्याचे समर्थन करू. पण हे करा. हे देशाच्या हितासाठी करा. त्यांनी जो टॅरिफ लावला आहे, त्याला हिंदू मुस्लीम माहिती नाहीये. तो देशावर लावला आहे. सगळ्यांचंच नुकसान होणार आहे. त्यावर चर्चा करा", अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारकडे केली.