शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

...तर आम्ही हे सहन करणार नाही; देवेंद्र फडणवीस यांचा ओवेसींसह महाविकास आघाडीलाही थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2024 13:02 IST

"त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब करत असाल, तर हे आम्ही सहन करणार नाही..." 

मला समजलं, आज या मतदारसंघांमध्ये ओवेसी आले होते. ओवेसींनी या ठिकाणी सभा घेतली. अलीकडच्या काळात ओवेसी देखील पोपटासारखे बोलत आहेत, पण मी ओवेसी यांना कालच सांगितलं, हे हैदराबाद नाही, ही मुंबई आहे, हा महाराष्ट्र आहे. छत्रपती शिवरायांच्या तळपत्या तलवारीने ज्या महाराष्ट्राने देव, देश आणि धर्मासाठी लढाई लढली आणि मोगलांना चारोखाने चित केलं, तो हा महाराष्ट्र आहे. अरे या ठिकाणी मी तुम्हाला सांगू इच्छितो, तुम्ही रजाकारांचं सरकार पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न पाहू नका. ओवेसी ज्या रजाकारांना आम्ही या महाराष्ट्रातनं घालवलं, त्यांना पुन्हा इथे आणण्याचं स्वप्न बघाल तर तुमचं स्वप्न याच महाराष्ट्रामध्ये गाढून टाकू, असा इशारा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ओवेसींना दिला आहे. ते मुंबईतील ओशिवरा मतदारसंघात महायुतीच्या प्राचर सभेत बोलत होते.

 फडणवीस म्हणाले, "अरे आम्ही कोण्या धर्माच्या विरोधात नाही आहोत, पण औरंगजेबाच्या थडग्यावर जाऊन कोणी जर तिथे फुल टाकत असेल तर लक्षात ठेवा, आमच्या संभाजी राजांनी औरंगजेबावर अशी परिस्थिती आणली की त्याचं थडग देखील याच महाराष्ट्रात तयार करावं लागलं. पण मराठ्यांना औरंगजेब कधी हरवू शकला नाही. त्या औरंग्याच्या थडग्यावर जाऊन त्या ठिकाणी जर तुम्ही नमस्कार करत असाल, आदाब करत असाल, तर हे आम्ही सहन करणार नाही." 

या देशात छत्रपती शिवाजी महाराजांनी जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय, तोच चालणार - उपमुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, "अरे आम्ही विकास करू, हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई, सगळ्यांचा विकास करू. पण तुम्ही, जर या ठिकाणी उलेमांच्या त्या ठिकाणी १७ मागण्या, काय मागण्या आहेत? वक्फ बोर्डाला हजार कोटी द्या, आमच्या लोकांना जे काही आमचे काजी आहेत त्यांना पगार द्या, १० टक्के मुस्लिमांना आरक्षण द्या, या १७ मागण्या, ज्या मागण्या देश हिताच्या मागण्या नाहीयेत." एवढेच नाही तर, "त्या मागण्यांवर जर या ठिकाणी काँग्रेस, उबाठा आणि शरद पवारांची पार्टी लेखी देत असेल आणि त्यांच्या पायावर लोटांगण घालत असेल आणि त्यांचे पाय चाटत असेल, तर आम्ही सहन करणार नाही. या देशामध्ये केवळ छत्रपती शिवाजी महाराज यांनी जो स्वधर्म आम्हाला शिकवलाय, तोच चालणार आहे. मतांचं लांगुल चालन हे आम्ही चालू देणार नाही," अशा शब्दात फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही निशाणा साधला.

तर व्होटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं -"या ठिकाणी जर ते व्होट जिहादचा नारा देत असतील तर व्होटांचं धर्मयुद्ध आम्हाला करता येतं. व्होटांचं धर्मयुद्ध पुकारा आणि त्या धर्मयुद्धामध्ये आपल्याला माहिती आहे, पार्थाने सांगितलं होतं, जिथे सत्य आहे तिथेच विजय आहे. सत्य आपल्या बाजूने आहे आणि म्हणून विजय देखील आपल्याच बाजूने आहे. उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी मतांकरता लाचारी पत्करली असेल, अरे आम्ही हार पतकरू पण लाचारी पत्करणार नाही, आम्ही शिवबाची पोरं आहोत, शिवबाचे मावळे आहोत," असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAsaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीSharad Pawarशरद पवारUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेस