शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

..तर संजय राऊत यांची जीभ हासडण्यात येईल, आमदार इद्रिस नायकवडींचा इशारा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:23 IST

परिस्थितीनुसार स्वबळावर लढण्याचा निर्णय

मिरज : उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर खालच्या पातळीची टीका करणाऱ्या संजय राऊत यांची जीभ हासडण्यात येईल, असा इशारा आमदार इद्रिस नायकवाडी यांनी पत्रकार परिषदेत दिला.उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर केलेल्या टीकेचा आमदार नायकवाडी यांनी निषेध केला. अजितदादा यांच्याविषयी बोलताना संजय राऊत यांनी विचार करावा, अन्यथा त्यांची जीभ हासडण्यात येईल, असा इशारा आमदार नायकवाडी यांनी दिला. ते म्हणाले, संजय राऊत यांचीच डीएनए चाचणी करावी. अजितदादांच्या विरोधात बोलल्यास त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी अधिक वेळ देण्यासाठी मी स्वतःहून राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, असेही आमदार नायकवाडी यांनी सांगितले. अजितदादांनी राज्यातील अल्पसंख्यांकाना हजारो कोटींच्या योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडे अल्पसंख्यांकाचा ओढा आहे.मी मागणी न करता मला विधान परिषदेवर संधी मिळाली, सांगली महापालिकेतील अकरा माजी नगरसेवक राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात आहेत, असा दावा करत, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीतील युतीबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नाही. मात्र, परिस्थितीनुसार स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही आमदार नायकवाडी यांनी स्पष्ट केले.