शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपरच्या 'त्या' होर्डिंगवरून BMC आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी, परवानगी कुणी दिली?
2
शिंदे गटाला एवढ्या जागा, केंद्रात सत्ताबदल होण्याची दाट शक्यता; पृथ्वीराज चव्हाणांचा महाराष्ट्रावर काय अंदाज...
3
लोकसभेनंतर कर्नाटकात ऑपरेशन नाथ, काँग्रेस सरकार कोसळणार? एकनाथ शिंदेंचा दावा, सिद्धरामय्यांची प्रतिक्रिया
4
1 जुलैपासून नवा कोच राहुल द्रविडची जागा घेणार; बीसीसीआयने अर्ज मागविले, या अटी ठेवल्या....
5
एका अटीवर सलमान खानला माफ करु शकतो बिष्णोई समाज, वाचा काय आहे नेमका तोडगा
6
"वारसा चालवण्यासाठी मुल जन्माला घालण्यात अर्थ नाही, जर..," पाहा काय म्हणाले Zerodhaचे Nikhil Kamath
7
इराणचं चाबहार बंदर भारताच्या ताब्यात; अमेरिकेला मिरची झोंबली, चीन-पाकलाही धक्का
8
होर्डिंग पडलेल्या ठिकाणीच नेते भिडले! संजय दिना पाटील किरीट सोमय्यांवर भडकले
9
'घोटाळ्याच्या चौकशीसाठी भुजबळांनी...';राऊतांचे मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप, थेट मोदींना लिहीलं पत्र
10
पेट्रोल भरायला आला अन् काळाने घात केला; घाटकोपर दुर्घटनेत युवकाचा दुर्दैवी अंत
11
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची तेजीसह सुरुवात; श्रीराम फायनान्सचे शेअर्स वधारले, सिप्लाच्या शेअरमध्ये घसरण
12
EPFO ची कोट्यवधी लोकांसाठी गूड न्यूज! घर, लग्न, आजार, शिक्षणासाठी ऑटो क्लेम सोल्युशन लाँच; पाहा
13
सावत्र लेक दिया मिर्झाला म्हणत नाही आई, अभिनेत्रीचा खुलासा, म्हणाली- "ती मला..."
14
पीओकेमधील गोंधळामुळे पाकिस्तान सरकारने गुडघे टेकले! २३ अब्ज रुपयांचा निधी जाहीर
15
LICची लखपती स्कीम! केवळ रोज ₹४५ रुपये जमा करून मिळवू शकता ₹२५ लाख; पाहा संपूर्ण डिटेल
16
काशी-वाराणसीतील मराठी समाज मोदींच्या पाठिशी; रोड शोमध्ये पंतप्रधानांचं मराठमोळं स्वागत
17
कोणताही मूर्ख माणूस असा उघडपणे बॅगा घेऊन पैसे वाटप करू शकतो का? राऊतांच्या दाव्यांवर शिंदे गटाचे प्रत्युत्तर
18
ईशा गुप्ताने केले आहेत Eggs Freeze, म्हणाली- "मी आज ३ मुलांची आई असते, पण..."
19
'कदम, दरेकर भाजपामध्ये गेल्यावर तोंडात दात नव्हते का?, सुषमा अंधारेंचा राज ठाकरेंवर पलटवार
20
आजचे राशीभविष्य १४ मे २०२४; सूर्य वृषभेत, दलाली, व्याज, कमिशनमधून मोठ्या धनलाभाची शक्यता

"...तर मुंबईची लोकल सेवा बंद करावी लागेल"

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2020 11:48 AM

सगळ्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांना, उद्योजकांना वर्क फ्रॉम होम किंवा गरज पडल्यास कार्यालयात 50 टक्क्यांपेक्षा कमी लोकांमध्ये काम करा, असं सांगितलेलं आहे.

मुंबईः देशात कोरोना व्हायरसनं अक्षरशः धुमाकूळ घातला आहे. आतापर्यंत या रोगानं तीन जणांचा मृत्यू झाला असून, 148हून अधिक जण कोरोनाबाधित आहेत. त्यानंतर आता राज्य सरकारनंही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचे पाऊल उचललं आहे. राज्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांचा आकडा 42 झाल्याचीही माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. मुंबईतल्या वाढत्या गर्दीवर मुख्यमंत्र्यांनी आपले विचार स्पष्ट केले आहेत. आम्ही परिस्थितीचं निरीक्षण करत आहोत. सगळ्या खासगी क्षेत्रातील कंपन्यांना, उद्योजकांना वर्क फ्रॉम होम किंवा गरज पडल्यास कार्यालयात 50 टक्क्यांपेक्षा कमी लोकांमध्ये काम करा, असं सांगितलेलं आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.जर मुंबईच्या जनतेनं आमचं ऐकलं नाही, तर मुंबईची लाइफलाइन असलेली ट्रेन आणि बस सुविधा 10 ते 12 दिवसांसाठी जनतेच्या हितार्थ बंद करावी लागेल. त्यादृष्टीनंही लक्ष ठेवून आहोत, असंही आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी स्पष्ट केलं आहे. सध्याची परिस्थिती ठीक आहे. कोणाचीही एकदम गंभीर स्थिती नाही. स्क्रीनिंग आणि टेस्टिंगमध्ये 42 संशयित रुग्णांचे वगळता बाकीचे सगळे निगेटिव्ह आलेले आहेत.काही लोकांची चाचणी होणं अजून बाकी आहे. चाचणी वाढवण्याचं काम आपण मोठ्या पद्धतीनं करतो आहोत. नवी मेडिकल कॉलेजमध्ये ज्या लॅब सुरू करायच्या आहेत. औरंगाबाद, धुळे, सांगली, कोल्हापूर त्या ठिकाणी लॅब सुरू करायच्या आहेत. सरकारची परवानगी आणि एनआयव्हीचं व्हेलिडेशन लवकर कसं मिळेल, यासाठी स्वतः प्रयत्न करणार आहे. 

प्रवासाचा इतिहास आणि लक्षणं आढळल्यावरच कोरोनाची तपासणी करण्यात येणार आहे. या दोन अटींच्या पूर्ततेनंतरच टेस्ट केल्या जातात. सर्दी, खोकला झाला म्हणून लगेचच चाचणी करण्यात येणार नाही. कोरोनाची लक्षणं असलेल्या लोकांच्याच चाचण्या केल्या पाहिजेत, हे नियमावली सांगते. सामाजिक दृष्टिकोनातून जे कोणी संशयित किंवा कोरोना पॉझिटिव्ह आढळत असतील, त्याबाबत दुजाभाव होता कामा नये. त्यांच्याबाबत माणुसकीला धरून नसलेली वर्तणूक करणं हे निषेधार्ह आहे. या आजारानं घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. सोसायटीतल्या लोकांनी अशा रुग्णांना मदत केली पाहिजे. 

टॅग्स :localलोकलcorona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस