शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
6
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
7
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
8
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
9
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
10
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
11
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
12
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
13
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
14
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
15
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
16
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
17
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
18
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट
19
Ghibli चे दिवस गेले! Nano banana model/BANDAI-style ट्रेंडिंग इमेज ट्राय केली का? 'हा' घ्या Prompt
20
भारतीय क्रिकेटरने स्वत:च्या हानिमून ट्रिपला रिंकू सिंगलाही नेलं होतं सोबत, वाचा धमाल किस्सा

...तर महाविकास आघाडी विधानसभेत स्पष्ट बहुमतानं जिंकेल; योगेंद्र यादवांची भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2024 23:04 IST

loksabha Election Result - लोकसभा निवडणुकीच्या निकालात योगेंद्र यादव यांनी दिलेला अंदाज जवळपास खरा निघाला. आता महाराष्ट्राच्या विधानसभेबाबत योगेंद्र यादव यांनी भाष्य केले आहे.  

मुंबई - महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीच लोकसभा निकालाचा आणखी जास्त परिणाम होण्याची शक्यता आहे.  कारण या निवडणुकीत मोदी फॅक्टर कमी होईल. २-५ टक्के मते कमी होतील. जर महाविकास आघाडी एकत्रित लढत असेल आणि उद्धव ठाकरेंचं नेतृत्व स्वीकारलं जात असेल तर स्पष्टपणे बहुमत महाविकास आघाडीला मिळू शकते अशी भविष्यवाणी राजकीय रणनीतीकार योगेंद्र यादव यांनी केली आहे.

योगेंद्र यादव म्हणाले की, ज्याप्रकारे शिवसेना, राष्ट्रवादी फुटली आणि मागील दरवाजानं सरकार बनवलं गेले, त्यामुळे लोक नाराज होते. एकनाथ शिंदेंची शिवसेना संपेल असा माझा अंदाज होता. परंतु ते चुकीचे ठरले. मात्र कोणती शिवसेना, कोणती राष्ट्रवादी खरी हे निकालातून दिसून आले. ज्यांना निवडणूक आयोगाने चिन्ह दिले ते खोटे आणि ज्यांना नाही दिले ते खरे आहेत हे सिद्ध झालं असं त्यांनी सांगितले. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. 

तसेच लोकसभा निवडणुकीत प्रकाश आंबेडकरांनी यंदा जे काही केले ते लोकांना आवडले नाही. संविधानाचा प्रश्न असताना राजकीय जे खेळ केले ते लोकांना आवडले नाहीत. जर विधानसभेला त्यांची वंचित मविआसोबत आले तर महायुती सत्तेत येण्याचा प्रश्नच येत नाही. मात्र नाही आले तरीही मविआ महाराष्ट्राच्या विधानसभेत पुढे आहे असं योगेंद्र यादव यांनी म्हटलं.

दरम्यान, निवडणुकीआधी काही ठिकाणी इंडिया आघाडीत ताळमेळ दिसला नाही. जागावाटप शेवटपर्यंत रखडले होते. पश्चिम बंगालमध्ये ते पाहिले. जर विरोधकांनी एकत्र सामोरे गेले असते तर २६५ ते २७५ जागा निवडून आल्या असत्या. मात्र विरोधकांनी ही संधी गमावली. पण लढायला संधी मिळाली आहे. आता ठीक करा. पुढील ६ महिन्यात काय होईल ते कुणी सांगू शकत नाही. विरोधकांनी जे काही करायचे ते कायदेशीर करावं असं यादवांनी सांगितले. 

काँग्रेसला मोठी भूमिका निभवावी लागेल

भाजपा आणि आरएसएससोबत केवळ निवडणुकीची लढाई नाही तर ही संस्कृती आणि विचारांची लढाई आहे. विरोधकांच्या अनेक नेत्यांशी बोलतो तेव्हा त्यातील निम्मे भाजपाची भाषा बोलतात. ते बदलावं लागेल. प्रादेशिक पक्षांनी हा देश एकत्र ठेवला आहे. भाजपाचा मुकाबला करण्यासाठी तुम्हाला राष्ट्रीय पक्ष हवाच. त्यासाठी येणाऱ्या काळात काँग्रेसला मोठी भूमिका निभवावी लागेल. राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा परिणाम या निकालात झाला असंही योगेंद्र यादव यांनी सांगितले.   

टॅग्स :Yogendra Yadavयोगेंद्र यादवMahavikas Aghadiमहाविकास आघाडीUddhav Thackerayउद्धव ठाकरेcongressकाँग्रेसlok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकाल