शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
2
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
3
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
4
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
5
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
6
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
7
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
8
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
9
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
10
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
11
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
12
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
13
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
14
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
15
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
16
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
17
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
18
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
20
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा

...मग अमित शाह सुद्धा मातोश्रीवर येऊन पक्षप्रवेश करतील; संजय राऊतांचा भास्कर जाधवांवरही खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2025 11:32 IST

कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. - संजय राऊत.

एकनाथ शिंदे शिवसेना गटाच्या ऑपरेशन टायगरवर ठाकरे गटाचे राज्यसभा खासदार संजय राऊतांनी टीका केली आहे. कसला ऑपरेशन टायगर आज सत्ता आहे म्हणून ऑपरेशन उद्या सत्ता नसेल तर यांचे अख्ख दुकान रिकामी होईल, असे राऊत म्हणाले. तसेच दोन तास आमच्या हातात ईडी आणि सीबीआय द्या अमित शहा सुद्धा मातोश्रीवर येऊन शिवसेनेमध्ये प्रवेश केल्याशिवाय राहणार नाहीत. बावनकुळेंपासून सगळे कलानगरमध्ये दिसतील, असे आव्हान राऊत यांनी सत्ताधाऱ्यांना दिले आहे. आम्ही सुद्धा सत्तेवर होतो पण इतक्या विकृत पद्धतीने सूड बुद्धीने आम्ही कधी सत्ता राबवली नाही, असेही ते म्हणाले.  कोकणामध्ये भास्कर जाधव हे पक्षाचे नेते आहेत आणि प्रमुख नेते आहेत. त्यांच्या कुटुंबात लग्न आहे त्यांची माझी सविस्तर चर्चा झाली. अचानक मीटिंग ठरल्यामुळे त्यांना निरोप थोडा उशिरा गेला. मी त्यांना ऑनलाईनचा पर्याय सुचविला. परंतू मातोश्री परिसरात जामर असल्यामुळे तिथे वायफायचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे ते जॉईन होऊ शकले नाहीत. ते काही एकनाथ शिंदे आहेत का रुसून आणि फुगून गावी जाऊन बसायला, असा टोलाही राऊत यांनी लगावला. 

विनायक राऊत हे कोकणातले नेते आहेत. त्यांच्याकडे जास्त माहिती आणि ती बरोबर असते. राजन साळवी यांनी आता पक्ष सोडला आहे, त्यांच्या बोलण्यावरती विश्वास ठेवू नये. लोकसभेला त्यांच्या मतदारसंघात विनायक राऊत यांना 18 हजाराचा मताधिक्य होते. राजन साळवी एवढे मजबूत नेते होते किंवा आहेत असे म्हणतात ते मग ते स्वतःला मताधिक्य का नाही देऊ शकले, असा सवाल राऊत यांनी केला. 

राजन साळवी हे पक्षाचे जुने, आमचे कार्यकर्ते होते. त्यांना आमदार, उपनेते अशी पक्षाने त्यांना सगळी महत्त्वाची पद दिली. सर्व काही दिले पण सत्ता जाताच तुम्हाला या उकाळ्या फुटतात का, सत्ता असती तर कोणी पळून गेले नसते. निवडणूक हरून देखील राहिले असते. तुम्ही उंदरासारखे पळून जातात महाराष्ट्रातील जनता आणि मराठी जनता हा पळकुटेपणा विसरणार नाही हे लक्षात ठेवा, असा इशारा राऊत यांनी दिला.

टॅग्स :Sanjay Rautसंजय राऊतAmit Shahअमित शाहBhaskar Jadhavभास्कर जाधवShiv Senaशिवसेना