शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

" त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे!" ; अजित पवारांची निलेश राणेंवर घणाघाती टीका

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: January 15, 2021 15:40 IST

ते काहीही बोलतात त्यावर मी व्यक्त व्हायचे का? अजित पवारांचा संताप

पुणे : एकीकडे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडेंवर बलात्काराचे आरोप तर दुसरीकडे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग्स प्रकरणात अटक केली आहे.यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची मोठी कोंडी झालेली पाहायला मिळते आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याची आयती संधी भाजपला मिळाली आहे. भाजपच्या अनेक दिग्गज नेत्यांनी राष्ट्रवादीवर जोरदार निशाणा साधला आहे. त्यात माजी खासदार व भाजप नेते निलेश राणे यांनी तर राष्ट्रवादीत चाललंय काय? जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे अशी जहरी टीका केली होती. त्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी संताप व्यक्त करत या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. 

अजित पवार हे पुण्यातील सर्किट हाऊस येथे आले होते.यावेळी ते बोलत होते. निलेश राणे यांनी राष्ट्रवादीत चाललंय काय? इतके गुन्हेगार मिळून एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी या पक्षात आहेत या केलेल्या जहरी टीकेवर ते चांगलेच संतापले. पवार म्हणाले, ते वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का? पण एक सांगतो, त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे.

विश्वास नांगरे पाटील व शरद पवार भेटीवरही टीका माजी खासदार निलेश राणे यांनी मुंबईचे सहपोलीस आयुक्त एका बलात्काराच्या प्रकरणासाठी एका पक्षाच्या नेत्याला कसे भेटू शकतात आणि ते पण त्यांच्या घरी? असा सवाल उपस्थित केला आहे. तसेच या भेटीतून हे प्रकरण झाकायचा अजेंडा दिसतोय, यामुळे पोलिसांवर लोकांचा विश्वास उडेल, सामान्य लोकांसाठी ही सुविधा आहे का? हेही आयुक्तांनी स्पष्टपणे सांगावे असे देखील मत व्यक्त केले होते. 

धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? अनिल देशमुख म्हणाले... कायदा कुणासोबतही भेदभाव करणार नाही. दोषींवर योग्य ती कारवाई करु. कायद्यापुढे कोणताही मंत्री किंवा संत्री मोठा नाही. कायद्यासमोर सर्व समान असतात. सध्या धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांची चौकशी सुरु आहे. यामधून जे काही निष्पन्न होईल, त्यानुसार संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे अनिल देशमुख यांनी म्हटले म्हटले आहे. याचबरोबर, या प्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर गुन्हा कधी दाखल करणार? असा प्रश्न विचारला असता याचे उत्तर देणे अनिल देशमुख यांनी टाळले आणि चौकशीतून सर्व माहिती पुढे येईलच, असे सांगितले.

 

टॅग्स :PuneपुणेAjit Pawarअजित पवारNilesh Raneनिलेश राणे PoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा