सेल्फीचा नाद जीवावर बेतता बेतता राहिला! महिला पाय घसरून नदीत पडली, वाचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2023 19:31 IST2023-07-30T19:30:52+5:302023-07-30T19:31:20+5:30
नदीत अडकलेल्या महिलेला वाचवले

सेल्फीचा नाद जीवावर बेतता बेतता राहिला! महिला पाय घसरून नदीत पडली, वाचली
शशिकांत ठाकूर
कासा : डहाणू तालुक्यातील वाघाडी येथील भीम बांधरावर सेल्फीच्या नादात एक महिला नदीत पडल्याने अडकली असताना उपसभापती यांनी तिला वाचवले.
सध्या सेल्फी काढण्याचा मोह अनेक जणांना आवरत नाही. रविवारी सूर्या नदीवरील वाघाडी येथील भीम बांध येथे डहाणूतील एक कुटुंब फिरावयास आले असताना दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. भीम बांधावर सेल्फी काढण्याच्या मोहात महिलेचा पाय घसरून ती नदीत पडली. तिला वाचवण्यासाठी तिच्याबरोबर आलेल्या दोन पुरुषांनी प्रयत्न केले, मात्र त्यांना जमत नव्हते. ही घटना घडली त्यावेळी डहाणू पंचायत समितीचे उपसभापती पिंटू गहला तेथे आपल्या कुटुंबास फिरायला आले होते. घटना पाहिली असता त्यांनी नदीत उडी घेत त्या महिलेला वाचवले. याबाबत त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.