शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

'उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हाच बंडाची सुरुवात झाली'; शहाजी पाटलांचा मोठा खुलासा

By ओमकार संकपाळ | Updated: July 6, 2022 18:11 IST

'अजित पवारांना 1500 तर रोहित पवारांना 750 कोटींचा निधी; आमच्यासोबत दुजाभाव'

मुंबई: काय ती झाडी, काय ते डोंगर, काय ते हाटील, एकदम ओकेच, या डायलॉगने राज्यात फेमस झालेले सांगोल्याचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांनी मोठा खुलासा केला आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत अनेक आमदारांना बंडखोरी का केली आणि निधीमध्ये कशाप्रकारे दुजाभाव केला जायचा, याबाबत त्यांनी माहिती दिली. 

'50 आमदारांना ते आवडलं नाही'एका वृत्त वाहिनीशी बोलताना शहाजी बाजू पाटील म्हणाले की, 'आमचे हे बंड काल-परवा ठरलेले नाही. याची सुरुवात उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, तेव्हाच झाली. मविका सरकार कुणालाच आवडले नव्हते. पण आम्ही सांगणार कोणाला, आमचे आमदार म्हणून शपथविधी झाले, नंतर घराकडे गेलो. नंतर अचानक फोन आला आणि मुंबईला बोलावलं. तिथे या हॉटेलमधून त्या हॉटेलमध्ये फिरवलं. उद्धव ठाकरे रात्री यायचे, काही मिनीटे बोलायचे आणि निघून जायचे. आम्हाला तेव्हा काहीच कळतं नव्हतं की, नेमकं चाललंय काय. ज्यांच्या विरोधात आपण लढलो, तिच माणसं सत्तेत सोबत असणार. आता काम कसे होणार, याचाच विचार मनात यायचा.' 

'निधीत दुजाभाव झाला''आमच्या 55 पैकी 50 आमदारांना ही आघाडी आवडली नव्हती. राष्ट्रवादी-काँग्रेसवाले आमची कामे करणार नाहीत, अशी अनेक आमदारांना भीती होती. माझे वाद निधीमुळे नाहीत, मला अनेक मंत्र्यांनी निधी दिला. मी आतापर्यंत 70-80 कोटींची कामे केली. पण, बारामतीला 1500 कोटींचा निधी मिळाला. 750 कोटी निधी रोहित पवारांना मिळाला. इतर नेत्यांनाही भरगोस निधी मिळाला. पण, आमच्याबाबत दुजाभाव झाला,' असे शहाजी पाटील म्हणाले. 

'आमच्यावर घाण आरोप केले''आम्ही उद्धव ठाकरेंना अनेकदा मनातलं बोलून दाखवलं होतं. वर्षावर बैठक झाली होती, त्यात आम्ही सगळी आकडेवारी मांडली. तिथे सगळ्या खात्यांचे सचिव होते, आम्ही त्यांना आधी राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नेत्यांचे आकडे वाचायला लावले. बंडखोरी केल्यामुळे आमच्यावर अनेक खालच्या पातळीवरचे आरोप झाले. इतकी खालची पातळी, इतकी घाणेरडी भाषा मी कधीच ऐकली नाही. चार महिला आमदार आमच्यासोबत होत्या, त्यांच्यावर वैश्या म्हणून टीका झाली. एका बाजुला परत या म्हणतात आणि दुसऱ्या बाजुला यांची प्रेत आणतो म्हणता,' असंही ते म्हणाले. 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाUddhav Thackerayउद्धव ठाकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेस