शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
3
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
4
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
5
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
6
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
7
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
8
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
9
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
10
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
11
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
12
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
13
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
14
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
15
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!
16
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
17
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
18
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
19
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
20
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे

वाघ आला रे आला, वस्तीत वाजणार सायरन ! हल्ले रोखण्यासाठी जंगलांबाहेर अदृश्य कुंपण देणार माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2023 08:11 IST

Tiger: वाघांच्या हल्ल्यात सहा वर्षांत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. वाघांकडून दिवसाआड एका तरी व्यक्तीवर हल्ला होत असल्याची वन क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांची तक्रार आहे.

मुंबई : वाघांच्या हल्ल्यात सहा वर्षांत २५० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे. वाघांकडून दिवसाआड एका तरी व्यक्तीवर हल्ला होत असल्याची वन क्षेत्रात राहणाऱ्या गावकऱ्यांची तक्रार आहे. हे रोखण्यासाठी आता आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची मदत घेतली जाणार आहे. वस्तीच्या आसपास वाघ येताच गावकऱ्यांना अलर्ट करण्यासाठी सायरन वाजणार आहे. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाजवळील दोन गावांत अशा प्रकारचे सायरन बसवण्यात येत आहेत.नुकतीच व्याघ्र गणना जाहीर झाली, त्यात महाराष्ट्रात ४०० च्या आसपास वाघ वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. ही संख्या वाढत असतानाच त्यांचा मानवाशी होणारा संघर्षही वाढीस लागला आहे. 

विधिमंडळाच्या अधिवेशनातही याचे पडसाद उमटले होते. सातारा सांगलीपासून विदर्भातील लोकप्रतिनिधींनी वाघ-बिबट्यांच्या हल्ल्यांबद्दल चिंता व्यक्त केली होती. सांगली जिल्ह्यातील वाळवा व शिराळा तालुक्यात गेल्या काही दिवसांत ५०० पेक्षा अधिक गाई-गुरांना बिबट्याने ठार केल्याची आकडेवारी आहे.  ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात सुमारे ८६ वाघ आहेत, चंद्रपूरमध्ये ११७ तर गडचिरोलीत २७ वाघ आहेत. 

डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी योजनेंतर्गत ३७६ कोटी खर्चचंद्रपूर जिल्ह्यात मानव वाघांच्या वाढत्या संघर्षावर मुख्य वन संरक्षकांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती नेमण्यात आली. त्यात वनांवरील गावकऱ्यांचे अवलंबन कमी करण्यास सुचवण्यात आले. त्याशिवाय डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेंतर्गत गावकऱ्यांना घरगुती गॅस, सौरऊर्जा उपकरणे, सौरऊर्जा कुंपण पुरवण्यासाठी आतापर्यंत ३७६ कोटी ७८ लाख रुपये खर्च करण्यात आले.

अदृष्य कुंपण असे करेल काम n आर्टिफिशिअल इंटेलिजन्सचा आधार घेत वाघांच्या आगमनाची सूचना देणारी यंत्रणा लावण्यात येत आहे. n यासाठी जंगलाबाहेर अदृश्य कुंपण उभारण्यात येणार आहे. त्यामध्ये थर्मल लहरींचा वापर केला जाईल. n यातून वाघ-बिबट्या जाताच त्यांच्या आगमनाचा इशारा गावकऱ्यांना मिळेल, असे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

टॅग्स :TigerवाघforestजंगलMaharashtraमहाराष्ट्र