शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

कुजबुज! ‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ, ठाकरे बंधूंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 06:31 IST

काही दिवसांपूर्वी महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेत भाजप आणि शिंदेसेनेचे नगरसेवक आपआपले गट करून सभागृहात बसले होते.

म्हणतात ना...‘दैव देतं कर्म नेतं’ 

‘दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा लाभ’ किंवा ‘दैव देतं कर्म नेतं’ अशी काहीशी अवस्था काँग्रेसची चंद्रपूरमध्ये झाली आहे. राज्यात सगळ्याच ठिकाणी सपशेल आपटले मात्र चंद्रपूरच्या जनतेने काँग्रेसला हात देत सत्ता स्थापनेची संधी दिली. त्या दिवसापासून काँग्रेसमधील आ. विजय वडेट्टीवार आणि खा. प्रतिभा धानोरकर यांच्या दोन गटात महापौर पदावरून वाद सुरू होता. वाद दिल्लीपर्यंत गेला. त्यावर वडेट्टीवार आणि धानोरकर यांना प्रत्येकी अडीच वर्षे महापौर मिळेल, असे ठरले. मंगळवारी निवडणूक झाली आणि उद्धवसेनेने भाजपला पाठिंबा देत काँग्रेसला बाजूला सारले. त्यामुळे ना वडेट्टीवार, ना धानोरकर, महापौर झाला तो भाजपचा. 

‘ते’ भाजपला पाठिंबा देणार का?

नवी मुंबई महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली असून या निवडणुकीत भाजपचे ६५, शिंदेसेनेचे ४२, उद्धवसेना २, मनसे १ आणि अपक्ष १ नगरसेवक निवडून आले आहेत. यामधील अपक्ष उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्याने भाजपच्या नगरसेवकांची संख्या ६६ झाली आहे. काही दिवसांपूर्वी महापौर, उपमहापौर निवडीसाठी विशेष सभेत भाजप आणि शिंदेसेनेचे नगरसेवक आपआपले गट करून सभागृहात बसले होते. उद्धवसेनेचे २ आणि मनसेचा १ नगरसेवकदेखील भाजप नगसेवकांच्या रांगेत बसल्याने त्यांचा भाजपला पाठिंबा असल्याची चर्चा उपस्थितांमध्ये रंगली होती. त्यामुळे आगामी काळात महापालिका सभागृहातदेखील ठाकरे बंधूंचे नगरसेवक भाजपला पाठिंबा देणार का? असा प्रश्न केला जात आहे.

जाण्यापूर्वी एकदा पत्ते पिसणार का ?

पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी नवी मुंबईचा कार्यभार घेतल्यानंतर अनेक  अधिकाऱ्यांची खांदेपालट केली. यामुळे खऱ्या अर्थाने अनेक अधिकारी खाकीच्या मूळ कर्तव्याला जागले. मात्र,  दीड वर्षात पुन्हा अवैध धंद्यांना मोकळे रान देण्यापासून ते कारवाईच्या नावाखाली लुटमारीचे प्रकार घडत आहेत. भारंबे यांच्यासह उपायुक्तांपर्यंत संपूर्ण फळीचा कार्यकाळ संपला असून, ते बदलीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यापूर्वीच भारंबेंच्या जाण्याकडे डोळे लावून बसलेले व राजाश्रय असलेल्या अधिकाऱ्यांनी पुन्हा पूर्वास्थेत येण्यावर भर दिला आहे. अशांना झटका देण्यासाठी भारंबेंनी पुन्हा एकदा पत्ते पिसून काही पोलिस ठाण्यांच्या प्रभारींचे खांदेपालट करणार का, असा सवाल सुज्ञांचा आहे.

आता चौदा गावे कधी वगळणार?

चौदा गावे नवी मुंबई महापालिकेत समाविष्ट केल्यापासून वनमंत्री गणेश नाईक यांनी त्यास विरोध केला. ही गावे नवी मुंबईत नको अशी स्पष्ट भूमिकाही घेतली होती. निवडणूक झाली की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगून ही गावे वगळण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. महापालिका निवडणुकीमध्ये याच विभागातून भाजपचे दाेन नगरसेवक निवडून आले आहेत. एक अपक्षानेही भाजपला पाठिंबा दिला आहे. निवडणूक झाल्यापासून चौदा गावे वगळण्याचा विषयही शांत झाला आहे. परंतु, आता गणेश नाईक बोलल्याप्रमाणे ही गावे नवी मुंबईमधून वगळणार का, वगळण्याचा मुहूर्त कधीचा असणार, असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. हा विरोध फक्त राजकारणासाठी होता की खरेच होता अशी चर्चा सुरू झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Chandrapur politics, Navi Mumbai shifts, and pending decisions stir local circles.

Web Summary : Chandrapur Congress infighting aided BJP's mayoral win. Navi Mumbai's political dynamics are shifting, with potential BJP support. Police transfers loom amid alleged corruption. The fate of fourteen disputed villages remains uncertain.
टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेRaj Thackerayराज ठाकरेEknath Shindeएकनाथ शिंदेBJPभाजपा