पालिकेतील 'स्ट्रीट फर्निचर घोटाळ्या'ची लोकायुक्तांकडून चौकशी व्हायला हवी- आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2023 18:20 IST2023-07-19T18:19:26+5:302023-07-19T18:20:21+5:30
कंत्राट रद्द केलं की तात्पुरती स्थगिती दिली, यावर पालिकेने उतर द्यावे

पालिकेतील 'स्ट्रीट फर्निचर घोटाळ्या'ची लोकायुक्तांकडून चौकशी व्हायला हवी- आदित्य ठाकरे
Aditya Thackeray: स्ट्रीट फर्निचर बाबतच्या कथित घोटाळ्यावर आज विधान भवनात चर्चा झाली. स्ट्रीट फर्निचर कंत्राट रद्द केलं आहे. पण महापालिकेकडून अजून एका शब्दाचेही उतर आलेलं नाही. याचे महापालिकेने उतर द्यायला हवे. राज्यपालांना पत्र लिहलं होतं. राज्यपालांना बीएमसीच्या रस्त्यावरील फर्निचर घोटाळ्याच्या विशिष्ट मागण्यांसह पत्र लिहिले आहे. या घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी करा, तो रद्द केला आहे की BMC कडून होल्ड केला आहे, याबद्दल स्पष्टता असणे आवश्यक आहे, याची मागणी आदित्य ठाकरेंनी पत्रातून केली.
"आज सकाळी मी महाराष्ट्राच्या माननीय राज्यपालांना बीएमसीच्या रस्त्यावरील फर्निचर घोटाळ्याच्या विशिष्ट मागण्यांसह पत्र लिहिले आहे. घोटाळ्याची निष्पक्ष चौकशी, आमदारांप्रती पारदर्शकता आणि उत्तरदायित्व आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, तो रद्द केला आहे की BMC कडून होल्ड केला आहे याबद्दल स्पष्टता असणे आवश्यक आहे", असे आदित्य ठाकरे म्हणाले. "हा मोठा घोटाळा आहे आणि तो जनतेसमोर आला आहे. क्रेडिटमध्ये मला जायचं नाही. सहा हजार कोटींचा घोटाळयाबदल आम्ही बोलत आहोत. स्ट्रीट फर्निचर हा घोटाळा आहे हे सिद्ध झाले आहे. पण याबद्दल मलादेखील उत्तर मिळालं नाही. यांची लोकायुक्तांकडुन चौकशी व्हावी, अशी मागणी केली होती. या अधिकाऱ्यांना आमचं सरकार येईल तेव्हा उत्तर द्यावे लागेल, नाहीतर जेल मध्ये जावं लागेल", असा इशारा आदित्य यांनी दिले.
"जे मंत्री म्हणत होते की ११० टक्के मंत्री होणार त्यांना आता कुठे ठेवलं आहे? त्यांना परत गुवाहाटीला पाठवणार का? शासन आपल्या दारीशासन आपल्या दारी ५२ कोटी खर्च झाले. अजूनही त्यांची फोटो बस स्टाॅप वैगरे एवढे पैसे जनतेवर खर्च करायला हवा होता,"