शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहितेच्या कात्रीत अडकले राज्य बालहक्क संरक्षण आयोग, सहा महिने अध्यक्षाविनाच

By विश्वास पाटील | Updated: December 25, 2025 18:20 IST

दोन वेळा अर्ज मागवूनही प्रक्रिया रेंगाळलेलीच

विश्वास पाटीलकोल्हापूर : राज्याच्या बालहक्क संरक्षण आयोगावरील अध्यक्ष व सदस्यांच्या नियुक्त्या गेली सहा महिने लटकल्या आहेत. आता या नियुक्त्यांना आचारसंहितेचा फटका बसला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीनंतर बहुधा मार्चनंतरच या नियुक्त्या होण्याची शक्यता आहे. परिणामी बालहक्कासंबंधीच्या राज्यभरातील सुनावण्या रेंगाळल्या आहेत.मुंबईच्या सुशीबेन शहा यांची अध्यक्षपदाची मुदत मे २०२५ मध्ये संपली. त्यामुळे अध्यक्ष व सहा सदस्य नियुक्त करण्यासाठी महिला व बालविकास विभागाने जानेवारी २०२५ मध्ये अर्ज मागवले. तेव्हा ३३३ अर्ज आले; परंतु अजून अनेक जणांना अर्ज करायचे असल्याने पुन्हा जूनमध्ये अर्ज मागवल्यावर १७१ अर्ज आले. तेव्हापासून तातडीने निवडीची प्रक्रिया राबवणे शक्य होते; परंतु तसे घडले नाही. हा आयोग निम्न न्यायिक स्वरूपाचा आहे; परंतु त्यावर काम करण्यासाठी राजकीय कार्यकर्त्यांच्या उड्या पडतात. सदस्य व अध्यक्षांची निवड करण्यासाठी राज्य सरकारने महिला व बालविकासमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. बालन्याय अधिनियमाच्या कलम १०९ नुसार राज्यातील बालकल्याण समित्यांवर देखरेख करण्याची जबाबदारी आयोगावर असते. आता आयोगाकडून फक्त प्रशासकीय कामे सुरू आहेत. विविध प्रकरणांत सुनावणी घेऊन निकाल देण्याचे अधिकार त्यांना नाहीत.

बालहक्क आयोगाची रचना

  • अध्यक्ष : एक
  • सदस्य : सहा
  • सचिव : वरिष्ठ आयएएस अधिकारी
  • कायदेशीर सल्लागार : न्याय संस्थेशी संंबंधित अधिकारी
  • पदाची मुदत : तीन वर्षे

आयोगाचे काम सुरू राहावे, यासाठी पदसिद्ध सचिवांना प्रभारी अध्यक्ष म्हणून कार्यभार सोपवण्यात आला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर तातडीने या नियुक्त्या होतील. - योगेश जवादे, सहायक आयुक्त, महिला व बालविकास विभाग 

या आयोगाची मुदत कधी संपते हे सरकारला माहीत असते, त्यामुळे त्यापूर्वीच अध्यक्ष व सदस्य निवडीची प्रक्रिया पूर्ण करून नवीन पदाधिकारी जाहीर होणे अपेक्षित असते; परंतु तसे घडत नाही. त्यामुळे काम बाधित होते. - डॉ. प्रमिला जरग, माजी अध्यक्षा, महिला व बालविकास संबंधित संस्थांचे राज्य नियंत्रण मंडळ, मुंबई

English
हिंदी सारांश
Web Title : Maharashtra Child Rights Body Stalls, Awaits Chairman Since Six Months

Web Summary : Maharashtra State Commission for Protection of Child Rights lacks a chairperson for six months. Appointment delays impact hearings. Election code further stalls selections, likely pushing them to March. Administrative tasks continue; judicial powers are suspended.