शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांना चैन पडेना, इराण चर्चेची प्रत्येक अपडेट घेतली; व्हान्स यांना हॉटलाइनवर फोनाफोनी!
2
"अमेरिकेच्या अवास्तव मागण्या...!" इराणने अमेरिकेवर फोडलं शांतता चर्चा फिसकटण्याचं खापर; व्हॉन्स म्हणाले...
3
पुन्हा युद्ध भडकणार? अमेरिका-इराण यांच्यात तोडगा नाहीच; पुढे काय होणार? जगाचे लक्ष लागले!
4
Ashok Kharat : औषधे आणि केबिनमधील ठसे; भोंदू अशोक खरातच्या कार्यालयाची पथकाकडून पुन्हा झडती
5
खळबळजनक! अंगणवाडीत मुलांनी खाल्लं उंदीर मारण्याचं औषध, ५ जणांची प्रकृती बिघडली
6
काळाचा घाला! हायवेवर गाडी पंक्चर, टायर बदलताना ट्रकने चिरडलं; ५ जणांचा मृत्यू
7
परळ- सीएसएमटी रेल्वे मार्गासाठी स्वदेशी मिल भागातील चाळी पडणार, ७१४ बाधित कुटुंबांचे पुनर्वसन पूर्ण
8
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
9
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
10
NIRDPR मध्ये जॉब मिळवण्याची संधी; जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया!
11
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
12
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
13
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
14
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
15
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
16
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
17
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
18
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
19
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
20
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

"...तोच प्रेक्षक म्हणतोय, आव्हाडांची काहीच चूक नव्हती, त्यांनी माझी मदत केली"; रोहित पवारांचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2022 17:02 IST

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती.

हर हर महादेव चित्रपटात छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल चुकीची माहिती दाखवली असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सोमवारी काही कार्यकर्त्यांना सोबत घेऊन रात्री दहा वाजण्याच्या सुमारास विवियाना मॉल येथील शो बंद पाडला होता. यावेळी चित्रपट पाहण्यासाठी आलेल्या एका प्रेक्षकास राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी मंगळवारी ठाण्यातील वर्तकनगर पोलीस ठाण्यात जितेंद्र आव्हाडांसह 100 कार्यकर्त्यांवर  गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर आज, वर्तकनगर पोलिसांनी आव्हाडांना अटक केली आहे. या संपूर्ण प्रकरणावर, आता आमदार रोहित पवार यांनी एक ट्विट करत मोठा दावा केला आहे.

"ज्या प्रेक्षकाला मारहाण झाल्याचा आरोप करण्यात आला तोच प्रेक्षक म्हणतोय की, “आव्हाड साहेबांची काहीच चूक नव्हती, उलट त्यांनी माझी मदत केली, त्यांना पोलिसांनी जाणून बुजून अटक केली आहे”. यावरून भाजपचा खरा चेहरा समोर आला आहे," असे ट्विट रोहित पवार यांनी केले आहे.

यालाच जोडून आणखी एक ट्विट करत, "सार्वजनिक ठिकाणी गोळीबार करणाऱ्यांना, जादूटोणा कायद्याला आव्हान देणाऱ्यांना मोकळं सोडायचं आणि छत्रपतींचा खोटा इतिहास दाखवणाऱ्या चित्रपटाला विरोध करणाऱ्या @Awhadspeaks साहेबांना अटक करायची ही या नव्या सरकारची कायदा-सुव्यवस्था आहे का?" असा प्रश्नही रोहित पवार यांनी केला आहे.

फाशी दिली तरी चालेल, पण...-अटकेनंतर एक ट्विट करत, "हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही, तो गुन्हा मी कबूल करणार नाही," असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

टॅग्स :Rohit Pawarरोहित पवारJitendra Awhadजितेंद्र आव्हाडNCPराष्ट्रवादी काँग्रेसPoliceपोलिस