शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
2
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
3
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
4
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
5
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
6
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
7
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
9
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
10
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
11
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
12
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
13
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
14
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
15
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
16
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
17
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
18
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
19
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर

अजित पवार जी भूमिका घेतील, ती मान्य; पहिल्यांदाच NCP आमदारानं दिलं जाहीर समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2023 17:41 IST

राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

पुणे - विधान सभेचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याविषयी वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा जोर धरू लागली आहे. दादांसोबत राष्ट्रवादीचे काही आमदारही जाणार असल्याचे बोलले जाते. अलीकडील अजित पवारांची विधाने पाहिली असता दादा सरकारबद्दल कुठेही आक्रमक वक्तव्य करताना पाहायला मिळत नाही. त्यामुळे या चर्चांना उधाण आले आहे. 

ज्यांना जायचं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, मात्र...; शरद पवारांचं मोठं विधान

त्यात आता राष्ट्रवादी आमदारांनीही उघडपणे भूमिका घ्यायला सुरुवात केली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीतही गट पडणार का? असे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे पिंपरी येथील आमदार अण्णा बनसोडे यांनी अजित पवार जी भूमिका घेतील ती १०० टक्के मान्य आहे असं विधान केले आहे. बनसोडे म्हणाले की, मी मागील काळातही अजितदादांसोबत होतो. उद्या अजितदादा जी भूमिका घेतील मी त्यांच्यासोबत ठाम असणार आहे. मी दादांचा कट्टर समर्थक आहे. माझा अजितदादांवर विश्वास आहे. दादा जो निर्णय घेतील त्यांच्यासोबत मी राहणार आहे असं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. 

अजित पवार भाजपात जाणार?राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे भाजपात जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. सुप्रीम कोर्टाचा निकाल कधीही लागू शकतो. त्याआधीच भाजपाने सरकार वाचवण्यासाठी पर्यायी व्यवस्थेची चाचपणी सुरू केलीय असं म्हटलं जाते. त्यात प्रामुख्याने अजित पवारांसह राष्ट्रवादीचे काही आमदार भाजपासोबत जातील असं बोलले जात आहे. सध्या यावर कुणीही थेट भाष्य करत नाही. मात्र ३० एप्रिलपर्यंत भाजपात पक्षप्रवेशाचा कार्यक्रम होणार आहेत असं सूचक विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले आहे. 

ज्यांना जायचं तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेलकेंद्रीय तपास यंत्रणाचा गैरवापर करून विरोधी पक्षाचे नेते फोडायचे काम सुरू आहे. शिवसेनेच्या बाबतीत तेच झालं. आमचे आमदार फोडले. आदित्य ठाकरे यांनी यावर खुलासा केला कसे नेते रडत होते. आम्हाला तुरुंगात जायचं नाही तेच तंत्र आता काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या बाबतीत वापरत आहेत असं संजय राऊतांनी म्हटलं होते. त्याचसोबत उद्धव ठाकरेंसोबतच्या बैठकीत शरद पवारांनी आपली भूमिका स्पष्ट करताना सांगितलं की, काही झालं कितीही दबाव आला तरी पक्ष म्हणून आम्ही भाजपसोबत जाणार नाही. यावर काही लोकांना जायचं आहे. तो त्यांचा वयक्तिक निर्णय असेल. काही कुटुंबावर दबाव आहे, मुलांवर दबाव आहे, घरातील महिलांना चौकशीसाठी बोलावलं जात आहे असे आमदार दबावाखाली निर्णय घेतात. तो निर्णय त्यांचा असेल तो पक्षाचा निर्णय नसेल असा खुलासा पवारांनी केला. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा