शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

मराठी भाषा स्वतंत्र नसल्याचा अहवालात उल्लेख; संस्कृत ही मराठीची बहीण आहे असा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2024 06:27 IST

नेमक्या त्रुटींवर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी ठेवले बोट

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: केंद्र शासनाला २०१३ साली अभिजात भाषेच्या दर्जासंदर्भात अहवाल सादर केला होता. मात्र, याला अकरा वर्षे उलटूनही अजूनही हा प्रस्ताव प्रलंबित आहे. या प्रस्तावातून अभिजात दर्जासंदर्भातील निकषांची पूर्तता होत नाही, असे म्हणत असताना त्यात नेमक्या त्रुटींवर इतिहास संशोधक संजय सोनवणी यांनी बोट ठेवले आहे. संस्कृत ही मराठीची बहीण आहे असा दावा या अहवालात आला असल्याने तेथेच मराठीचे अभिजत्व रद्द होते. त्यामुळे मराठी भाषा स्वतंत्र असूनही तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळू शकत नसल्याचे म्हटले आहे.

तसेच, याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिजात दर्जा पाठपुरावा समितीला पत्र लिहून अहवालात बदल करण्याचीही मागणी केली आहे. आर्यावांश सिद्धांतासारखाच असलेला इंडो-युरोपियन भाषा समूह सिद्धांत गृहीत धरून मराठीला मिडल इंडो-युरोपियन गटात टाकून मराठीला संस्कृतपेक्षा दुय्यम स्थान दिले गेले आहे. इसवी सन चारमध्येच विमल सुरी यांनी “पउमचरिय” हे रामावरील आद्य महाकाव्य महाराष्ट्री प्राकृतात लिहिले. या राष्ट्रीय संस्कृतीत मोलाची भर घालणाऱ्या रामावरील आद्य महाकाव्याचा फक्त ओझरता उल्लेख या अहवालात केला गेला आहे.  मौलिक साहित्य हा अभिजात भाषेचा महत्त्वाचा निकष असताना हे महत्त्वाचे साहित्य विवेचनातून सुटावे व ओझरती दखल घेतली जावी हे दुर्दैवी आहे. माहाराष्ट्री (मराठी) भाषेचे वय हे किमान तीन हजार वर्षे एवढे येते, ही बाब अहवालात नमूद नाही.

भाषेचा प्रवास नेमका कसा होतो, लोक सुलभीकरणासाठी उच्चार कालौघात कसे बदलत नेतात, जीवन व्यवहारातील गुंतागुंत वाढते तशी भाषेचीही गुंतागुंत कशी वाढते व नवे शब्द कसे उदयाला येतात अथवा अर्थबदल करून परभाषेतून कसे स्वीकारले जातात, या भाषाशास्त्रीय प्रक्रियेचा व त्यांना असलेला भौगोलिक संदर्भांचा कसलाही आधार या अहवालात घेतला गेला नाही. मराठी भाषा अभिजात कशी हे सिद्ध करण्यात हा अहवाल कमी पडतो असे मत आहे. या काही बाबी  अहवालात आहेत, ज्या दुरुस्त करण्याची नितांत आवश्यकता आहे.-संजय सोनवणी, इतिहास संशोधक

टॅग्स :marathiमराठीEknath Shindeएकनाथ शिंदेCentral Governmentकेंद्र सरकार