शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

आता राहिलेल्या आमदारांनीही राजीनामा द्यावा; शिंदेंच्या मंत्र्यांची निकालानंतर मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2023 15:48 IST

एकनाथ शिंदेंचं सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेलं आहे, असे ठाकरे गटाचे आमदार, माजी मंत्री अनिल परब म्हणाले होते.

सर्वोच्च न्यायालयाने आज महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर निकाल दिला आहे. एकनाथ शिंदेंसह १६ आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे. उद्धव ठाकरेंनी स्वेच्छेने मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला नसता तर आम्ही त्यांना पुन्हा मुख्यमंत्री पदी बसविले असते असे कोर्टाने म्हटले आहे. यावर उद्धव ठाकरेंची देखील प्रतिक्रिया आली आहे. मी राजीनामा दिला, कारण गद्दारांच्या समोर बहुमत चाचणी देणं मला मान्य नव्हतं. म्हणून मी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा दिला, असे ठाकरे म्हणाले होते. यावर शिंदेंचे रोजगार हमी योजना मंत्री संदिपान भुमरे यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.

एकनाथ शिंदेंचं सरकार थोड्या दिवसांसाठी वाचलेलं आहे. आमदारांच्या अपात्रतेची कारवाई कोर्टाने विधानसभा अध्यक्षांकडे पाठविलेली आहे. ती पाठवताना स्पष्टपणे त्यावेळच्या राजकीय पक्षाचा व्हीप लागू होतो. सुनिल प्रभू तेव्हाचे व्हीप होते. त्यांनी बजावलेल्या व्हीपचे उल्लंघन झालेले आहे हे अतिशय स्पष्ट आहे. ते रेकॉर्डवर आहे. आता फक्त तांत्रिक गोष्टी राहिल्या आहेत, असे ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी म्हटले आहे. त्यांना भुमरे यांनी प्रत्यूत्तर देताना कोर्टाने सांगितले शिंदे सरकारला धोका नाही, अनिल परब कोण कोर्टापेक्षा मोठे आहेत का, असा सवाल केला आहे. 

सगळ्या महाराष्ट्रात जल्लोष साजरा होत आहे. कोर्टाने दिलासा दिला आहे, आता मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला धोका नाही. धोका त्यांना आहे, कोर्टाने जो निकाल दिला तो मान्य आहे. खैरे पाण्यात देव बुडवून बसले आहेत. त्यांना म्हणा तुम्ही अशीच यज्ञ पुजा करत बसा. अनिल परब काय बोलले याला महत्त्व नाही, कोर्ट काय बोलते याला महत्व आहे. या राहिलेल्या आमदारांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी भुमरे यांनी केली आहे. 

वायफळ चर्चा करणार्‍यांना सुप्रीम कोर्टाने मारली चपराक - संजय गायकवाड विरोधकांना उकळ्या फुटत होत्या, बालिशपणाचे स्टेटमेंट करत होते, राऊत बकबक करत होते. कोर्टाने त्यांच्या चांगलीच कानफटात मारली आहे. याद्वारे अशा वायफळ चर्चा करणार्‍यांना ही एक सुप्रीम कोर्टाने चपराक मारली आहे, अशी प्रतिक्रिया सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्णयावर बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी दिली आहे.

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षSandipan Bhumreसंदीपान भुमरेEknath Shindeएकनाथ शिंदेUddhav Thackerayउद्धव ठाकरेSupreme Courtसर्वोच्च न्यायालय