शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अखेर ‘पंतप्रधाना’ला मिळाला जन्म दाखला; बाळाला तीन महिन्यांनी मिळाले नाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2022 12:38 IST

पंतप्रधान या नावाचा जन्म दाखला द्यायचा कसा, या संभ्रमात आरोग्य विभाग पडला.

गुणवंत जाधवर उमरगा (जि. उस्मानाबाद) : जन्मानंतर तब्बल तीन महिने पदनामाच्या फेऱ्यात अडकून पडलेला चिंचोली भु. येथील पंतप्रधानाचा जन्म दाखला अखेर मुक्त झाला आहे. आरोग्य विभागाने पंतप्रधान हे नाव संविधानिक पदनाम असल्याने तो लटकून ठेवला होता. मात्र, हा गुंता सुटल्याने गुरुवारी पंतप्रधानाच्या पालकांना जन्म दाखला सुपूर्द करण्यात आला. 

चिंचोली भु. येथील दत्ता व कविता चौधरी या दाम्पत्याने १९ जून २०२० रोजी जन्मलेल्या पहिल्या मुलाचे नाव राष्ट्रपती असे ठेवले. या नावाचा जन्म दाखलाही त्यांना मिळाला. तसे आधार कार्डही त्यांनी बनवून घेतले. यानंतर १० नोव्हेंबर २०२१ रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र बोरामणी (जि. सोलापूर) येथे त्यांना दुसरे बाळ झाले. या बाळाचे त्यांनी बारसे घालून ‘पंतप्रधान’ असे नामकरण केले. प्राथमिक आरोग्य केंद्र कार्यालयात दत्ता चौधरी यांनी जन्म दाखला मिळण्याकरिता २७ नोव्हेंबर २०२१ रोजी अर्ज केला. मात्र, पंतप्रधान या नावाचा जन्म दाखला द्यायचा कसा, या संभ्रमात आरोग्य विभाग पडला. येथील आरोग्य केंद्राकडून ‘पंतप्रधान’ हे संविधानिक पदनाम असल्यामुळे या नावाचा जन्म दाखला द्यावा किंवा कसे, याबाबत मार्गदर्शनासाठी सोलापूरच्या जिल्हा निबंधक, जन्म-मृत्यू तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे १ डिसेंबर रोजी पत्र पाठवले होते. तोपर्यंत या बालकाचे पिता दत्ता चौधरी हे जन्म दाखल्यासाठी चकरा मारत होते. तीन महिने उलटून गेल्यावर या जन्म दाखल्यावर मोहोर उमटली. गुरुवारी पंतप्रधानाच्या पित्याकडे जन्म दाखला तयार करून सुपूर्द करण्यात आला. 

माझ्या पहिल्या मुलाचा ‘राष्ट्रपती’चा जन्म दाखला मिळाला आहे. या नावाने आधार कार्डही बनवून घेतले आहे. मात्र, पंतप्रधानाच्या वेळी हे संविधानिक पदनाम असल्यामुळे सदरील बालकास हे नाव देता येईल का? याबाबत मार्गदर्शन मिळावे, या आशयाचे जिल्हा आरोग्य अधिकारी यांना पाठवलेल्या पत्राची प्रत मला देण्यात आली होती. त्यामुळे काही काळ मी वाट पाहिली. मात्र, पाठपुरावा सोडला नाही. अखेर आज या नावाचा जन्म दाखला प्राप्त झाला. - दत्ता चौधरी, पालक