शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पुढील निवडणुका आघाडीत की स्वबळावर?, काँग्रेससमोर पेच; पक्षाची वाट बिकट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2022 10:32 IST

यापुढील निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढायचे की आघाडीतून मार्गाक्रमण करावयाचे, याबद्दल अद्यापही पक्षश्रेष्ठींसमोर चित्र स्पष्ट नाही

सुरेश भुसारीमहाराष्ट्रकाँग्रेसबाबत दिल्लीतील पक्षश्रेष्ठी संभ्रमात आहेत. यापुढील निवडणुकांमध्ये काँग्रेसने स्वबळावर लढायचे की आघाडीतून मार्गाक्रमण करावयाचे, याबद्दल अद्यापही पक्षश्रेष्ठींसमोर चित्र स्पष्ट नाही. नेतृत्वाचा अनुशेष ही पक्षश्रेष्ठींपुढील चिंता आहे.

महाविकास आघाडी टिकण्याची शक्यता मावळत चालली आहे. शिवसेनेत ‘काँग्रेस-राष्ट्रवादी नको’ असा दबाव सतत वाढत आहे. काँग्रेसमधील काहीजणांना राष्ट्रवादीची साथ नको आहे. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये एकमुखी नेतृत्व उरलेले नसल्याने राज्यातील स्थितीबद्दल अद्यापही दिल्लीतील पक्षश्रेष्ठींना नेमकी स्थिती कळायला मार्ग नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या तोडीचा नेता काँग्रेसमध्ये नाही. यामुळेच अनेक मुद्द्यांवर पवारांशी चर्चा करून पक्षश्रेष्ठी निर्णयाप्रत जात आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाची भाषा केली खरी; परंतु काहींचा आघाडी केल्याशिवाय पक्षाचे  काही खरे नाही, यावर ठाम विश्वास आहे. या संभ्रमावस्थेबद्दल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी ‘लोकमत’शी बोलताना महाराष्ट्रात काँग्रेसपुढे आव्हान असल्याचे मान्य केले. महाराष्ट्रात काँग्रेसला ७० आमदार निवडून आणण्याचे आव्हान आहे, असेही खरगे यांनी सांगितले. 

पक्षादेश धुडकावणाऱ्यांना तूर्तास अभय? राज्यसभा व विधान परिषदेच्या निवडणुकांमध्ये सातजणांनी पक्षादेश धुडकावल्याची तक्रार प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केल्यानंतर मोहन प्रकाश यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. मोहन प्रकाश हे महाराष्ट्रात गेलेले नाहीत. पक्षादेशाचे पालन न करणाऱ्यांमध्ये माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांसारखे ज्येष्ठ नेते असल्याने पक्षश्रेष्ठींची चिंता अधिक वाढली आहे. 

नितीन राऊतांची दिल्ली वारी माजी मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंगळवारी दिल्लीत येऊन पक्षातील काही ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. या भेटीबाबत डॉ. राऊत म्हणाले, विशेष कोणताही अजेंडा नव्हता. काही नेत्यांची सदिच्छा भेट घेण्याचा उद्देश होता.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtraमहाराष्ट्र