शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
3
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
4
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
5
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
6
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
7
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
8
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
9
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
10
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
11
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
12
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
13
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
14
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
15
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
16
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
17
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
18
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
19
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
20
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  

Uddhav Thackeray "पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचं काम निवडणूक आयोगाचं नाही", उद्धव ठाकरेंनी ठणकावून सांगितलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2023 13:12 IST

Uddhav Thackeray आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

अमरावती : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर राज्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या राजकीय भूकंपानंतर उद्धव ठाकरे Uddhav Thackeray यांनी राज्यात दौरा सुरू केला आहे. आज विदर्भातील दौऱ्यावर असताना उद्धव ठाकरे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी फोडाफोडीच्या राजकारणावर भाष्य केले. तसेच, शिवसेना हे पक्षाचं नाव माझ्यासोबत राहील, ते बदलण्याचे काम निवडणूक आयोगाचे नाही, असे उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितले.  

सध्या सगळेजण पाहत आहेत, राजकारणात पक्ष फोडणे ही गोष्ट नवी नव्हती. पण, आता लोक पक्ष चोरत आहेत. पण, शिवसेना हे पक्षाचे नाव माझ्यासोबत राहील. शिवसेना हे नाव माझ्या आजोबांनी दिले होते. ते नाव मी कोणाला घेऊ देणार नाही. नाव देणं हा निवडणूक आयोगाचा आधिकारच नाही. निवडणूक चिन्ह निवडणूक आयोग देऊ शकते, तो त्यांचा अधिकार आहे. पक्षाचे नाव माझंच आहे आणि ते माझ्याकडेच राहील. निवडणुकांदरम्यान नियमांचे पालन होत आहे की नाही, ते पाहणे त्यांचे काम आहे. पक्षाचे नाव बदलण्याचा त्यांना अधिकार नाही, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

याचबरोबर, सध्या जाहीर सभेचा काळ नाही. त्यामुळे मी सभेसाठी फिरत नाही. कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी फिरत आहे. सर्व कार्यकर्त्यांना मातोश्रीवर भेटणे शक्य नाही. या आव्हानात्मक काळात कट्टर शिवसेना कार्यकर्त्यांना भेटत आहे, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले. तसेच, राज्यातील मंत्रिमंडळ विस्तारावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी भाष्य केले. सध्या मी मुख्यमंत्री नाहीये, त्यामुळे त्यावर भाष्य करू शकत नाही. पण काल सामना पिक्चरमधील गाणं आठवलं कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे अशी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

'राइट टू रिकॉल' योजनाकोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे अशी परिस्थिती सध्याच्या सरकारची आहे. पूर्वी सरकार मतपेटीतून जन्माला सत्तेत यायचे, आता खोक्यातून जन्माला येत आहे. तुम्ही मतदान कोणालाही करा सरकार माझंच येईल असं बोलायला लागले आणि तसा जर पायंडा पडला तर उद्या जो कोणी दमदाट्या किंवा पैशाचा खेळ करू शकतो तो राज्याचा मुख्यमंत्री किंवा देशाचा पंतप्रधान होऊ शकतो. त्यामुळे शिवसेनाप्रमुखांनी तेव्हा 'राइट टू रिकॉल' योजना मांडली आहे. मी निवडून दिलेल्या लोक प्रतिनिधींनी चुक केली असेल, आमच्यासह जो कोणी करेल त्यांना परत बोलवण्याचा अधिकार द्यायला पाहिजे का? यावर देशात विचार व्हायला पाहिजे असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

टॅग्स :Uddhav Thackerayउद्धव ठाकरेMaharashtra Political Crisisमहाराष्ट्रातील सत्तासंघर्षShiv SenaशिवसेनाElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगAmravatiअमरावती