शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
5
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
6
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
7
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
8
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
9
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
10
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
11
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
12
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
13
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
14
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
15
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
16
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
17
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
18
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2025 07:39 IST

Monsoon Update: मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होतील. या बदलानुसार, गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

मुंबई - मुंबईसह कोकणात लवकर दाखल झालेला मान्सून जागेवरच रेंगाळला असला तरी पुढील पाच दिवस राज्याच्या हवामानात उल्लेखनीय बदल होतील. या बदलानुसार, गुरुवारपासून कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागांतही मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता आहे.मुंबईला आगमनावेळीच पावसाने दणका दिला. मुंबईची दाणादाण उडवून पाऊस बेपत्ता झाला. परिणामी, वाढत्या उकाड्याने मुंबईकर पुन्हा घामाने निथळत आहेत.

कोकणसह मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस पडणार३० जूनपर्यंत पावसाची शक्यता असून त्यातील पहिल्या आठवड्यात कोकणसह मध्य महाराष्ट्रात, तर दुसऱ्या आठवड्यात मध्य भारतात चांगला पाऊस पडणार आहे. तिसऱ्या आठवड्यातही मध्य भारतातही चांगला पाऊस आहे. थोडक्यात, पुढील तीन आवठड्यांत देशभरात चांगल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, उणे ३२ पासून १०८ पर्यंतची मान्सूनची मजल मोठी असेल. जर का तसे होणार असेल तर देशात बऱ्याच ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता आहे. काही ठिकाणी पूरसदृश परिस्थितीची शक्यता आहे.  

कोणत्या जिल्ह्याला कधी ऑरेंज अलर्ट? पुढील तीन ते चार दिवस कोकण, विदर्भात धो-धो बरसणारगुरुवार : अकोला, अमरावती, नागपूर, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सांगली आणि कोल्हापूरशुक्रवार : रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, अकोला, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली शनिवार : रायगड, रत्नागिरी  आणि सिंधुदुर्ग  रविवार : रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग

देशात मोठा पाऊस पडणार; पूरसदृश स्थितीहवामान शास्त्रज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी सांगितले की, सध्या देशामध्ये पावसाचे प्रमाण ३२ टक्के कमी नोंदले गेले असताना हवामान विभागाच्या अंदाजानुसार, जूनमधील पाऊस १०८ टक्के असण्याची शक्यता आहे. युरोपियन आणि हवामान विभागाचे मॉड्यूलनुसार पुढील तीन आठवडे देशात चांगल्या पावसाची शक्यता आहे.    

टॅग्स :monsoonमोसमी पाऊसweatherहवामान अंदाजRainपाऊसMaharashtraमहाराष्ट्र