महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका
By सदानंद नाईक | Updated: October 17, 2025 19:38 IST2025-10-17T19:33:54+5:302025-10-17T19:38:39+5:30
Swami Avimukteshwaranand News: राज्य शासनने गायीला दिलेल्या राज्य मातेचा दर्जाची अंमलबजावनी झाली नसल्याने ते कागदावर असल्याचे मत शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र सरकारने गौमातेला दिलेला राज्य मातेचा दर्जा कागदावरच, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांची टीका
- सदानंद नाईक
उल्हासनगर - कॅम्प नं-५, येथील साई वसणशाह दरबारामध्ये सतगुरू साईं वसणघोट यांच्या १३१ व्या जन्मो महोत्सवानिमित्त ज्योतिर्मठ बद्रीनाथ पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे सत्संग व प्रवचन गुरुवारी झाले. यावेळी राज्य शासनने गायीला दिलेल्या राज्य मातेचा दर्जाची अंमलबजावनी झाली नसल्याने ते कागदावर असल्याचे मत शंकराचार्य यांनी व्यक्त केले.
उल्हासनगर कॅम्प नं-५ येथील साई वसणशाह दरबारामध्ये सतगुरू साईं वसणघोट यांची १३१ वी जन्मोमहोत्सव साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त ज्योतिर्मठ बद्रीनाथ पीठाचे जगद्गुरु शंकराचार्य, स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचे सत्संग व प्रवचन गुरुवारी ठेवण्यात आले होते. प्रवचन व सत्संगाला सामाजिक संस्था, संत, पंचायतीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मसन्द सेवाश्रम रायपूरचे पीठाधीश साईं जलकुमार मसन्द साहिब यांच्या पुढाकाराने आणि साईं कालीराम साहिब यांच्या उपस्थितीत प्रवचन व सत्संगाचा कार्यक्रम गुरुवारी रात्री पार पडला. शंकराचार्यांनी सिंधमधील नागरिकांची जबाबदारी ज्योतिर्मठांतर्गत निश्चित केली असल्याने, ते सिंधी समाजातील संतांना शंकराचार्यांशी जोडण्याचे अभियानही चालवत आहेत.
महाराष्ट्र सरकारने गौमातेला राज्य माताचा दर्जा दिला, परंतु या संदर्भात अद्याप अधिकृत अंमलबजावनी केली नाही. जोपर्यंत अंमलबजावनी होत नाही, तोपर्यंत राज्या गोमाता दर्जा कागदावर असल्याचे शंकराचार्य म्हणाले. गाय मातेला 'पशु' (जनावरांच्या) श्रेणीतून काढून 'माता' आणि 'मनुष्य' च्या श्रेणीत आणावे लागेल. जे गौमातेची हत्या करतात. त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, राज्य सरकारने गोमाता दर्जाची अंमलबजावनी करावी, तसेच गौमातेला 'राष्ट्रमाता' घोषित करण्यासाठी 'गौ संसद' भारतीय संसदेच्या समांतर कार्य करेल. यासाठी भारतातील बहुसंख्य लोकांनी गायीला आपली माता मानले पाहिजे, आपोआप ती 'राष्ट्रमाता' बनेल. असेही शंकराचार्य म्हणाले.