मुंबई : एकीकडे विरोधक अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी करत असताना झिरवाळांचा लाच प्रकरणात सहभाग नाही, त्यांच्याविरुद्ध कोणताही पुरावा नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच उद्या माझ्या कार्यालयात कुणी गडबड केली तर कारवाई होणार, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सुनावले आहे.
याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, एसीबीकडे येणारी तक्रार कोणत्या स्तरावरील आहे हे न बघता तिथे जाऊन कारवाई करा, अशा स्पष्ट सूचना मी दिल्या आहेत. उद्या माझ्याही कार्यलायात कुणी एखाद्या व्यक्तीने असा व्यवहार केला तर त्याला पकडण्याची मुभा मी दिलेली आहे. कार्यालयात असा एखादा पकडला गेला तर त्याला मंत्र्यांचा वरदहस्त आहे, असे समजण्याचे कारण नाही. एसीबी पूर्ण पुरावे गोळा करूनच कारवाई करते. झिरवाळ यांच्या प्रकरणात कुठल्याही पुराव्यात, संभाषणात मंत्र्यांचे नाव आलेले नाही, ते जर आले असते तर आम्ही मंत्र्यांनाही राजीनामा मागितला असता, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
'अजित पवारांनी अर्थसंकल्पाची तयारी चांगली केली होती'
राज्यातील जनसामान्यांना दिलासा देतानाच राज्याची आर्थिक शिस्त पाळण्यासाठी कडक पावले उचलण्याचे स्पष्ट संकेतही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत. हे करत असताना चांगला चांगला अर्थसंकल्प मांडण्याच आम्ही प्रयत्नकरू, अजित पवारांना जे अपेक्षित होते ते सगळेमुद्दे, त्यांनी केलेल्या सूचना यात अंतभूत करू, असेत्यांनी यावेळी सांगितले.
अजित पवारांनी अर्थसंकल्पाची चांगली तयारी केली होती. चांगला अर्थसंकल्प देण्याचा त्यांचा मानस होता. पण दुर्दैवाने हा अर्थसंकल्प मांडण्याची वेळ माझ्यावर आली आहे. कुठल्याही मुख्यमंत्र्यांना निर्धास्तपणे अर्थखाते ज्या व्यक्तीला देता येईल असे अजितदादा होते, असे मुख्यमंत्री फडणवीस अजित पवारांची आठवण काढताना म्हणाले.
आपण विकसनशील अर्थव्यवस्था आहोत, त्यामुळे प्रत्येक अर्थसंकल्प सादर करताना कसरत करावी लागलेच. पण चालू योजना बंद करण्याची वेळ आमच्यावर येणार नाही, असे त्यांनी एका उत्तरात सांगितले.विरोधकांना टोला
विरोधकांचा पत्रात प्रचंड चुका
विरोधकांचे सहा पानांचे १८ मुद्यांचेपत्र मला मिळाले. शरद पवार गटाचे आमदार विरोधकांच्या बैठकीला हजर नव्हते. त्यामुळे त्यांनी एका माजी आमदाराची सही त्यावर घेतली. जागतिक मातृभाषादिनी मातृभाषेच्या प्रचंड चुका या पत्रात आहेत, असा टोला मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना लगावला.
विरोधकांकडून सातत्याने जनादेशाचा अपमान करण्याचे काम होत आहे. सत्ताधाऱ्यांना मस्ती आली आहे, माज चढलाय अशा शब्दांत ते जनादेशाचा अपमान करतात. आमचे सर्व सत्तारूढ पक्ष विनम्रतेने जनतेत जातात आणि जनतेची सेवा करतात, म्हणून स्थानिक निवडणुकीत आम्हाला जनतेने अभूतपूर्व विजय दिला आहे. यातूनही ते शिकणार नसतील तर विरोधकांचे काय होईल, हे वेगळे सांगण्याची गरज नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
आर्थिक शिस्तीत अजितदादांनी तडजोड केली नाही: सुनेत्रा पवार
अजित पवारांनी ११ वेळा राज्याचा अर्थसंकल्प सादर केला. आर्थिक शिस्तीशी अजितदादांनी कधीच तडजोड केली नाही. यंदाचा अर्थसंकल्प त्यांचा १२ वा अर्थसंकल्प ठरला असता, पण अचानक ते सोडून गेले. देवेंद्र फडणवीस मांडणार असलेला यंदाचा अर्थसंकल्पही राज्याला विकासाच्या वाटेवर नेणारा असेल, याचा मला ठाम विश्वास आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या.
महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे : एकनाथ शिंदे
अर्थसंकल्पीय अधिवेशन म्हटले की सगळ्यांचे लक्ष अजितदादांकडे लागायचे. पण दुर्दैवाने ते आपल्यात नाहीत. दादांना श्रद्धांजलीवाहून अधिवेशनाची सुरुवात करण्याची वेळ आली. विकास लांबणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही, असे अजितदादा मागील अर्थसंकल्प मांडताना म्हणाले होते. त्यांचे स्वप्न पूर्णकरायचे आहे, महाराष्ट्राला पुढे न्यायचे आहे. फडणवीस मांडणार असलेला अर्थसंकल्प राज्याला प्रगतीच्या नव्या शिखरावर नेणारा असेल, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
Web Summary : Maharashtra's budget session commences amid political tensions. Narhari Zirwal receives a clean chit in a bribery case. CM Fadnavis praises Ajit Pawar's economic expertise, while highlighting the government's commitment to fiscal discipline. Opposition criticism and the state's economic development were also discussed.
Web Summary : महाराष्ट्र का बजट सत्र राजनीतिक तनाव के बीच शुरू हुआ। नरहरि झिरवाल को रिश्वत मामले में क्लीन चिट मिली। मुख्यमंत्री फडणवीस ने अजित पवार की आर्थिक विशेषज्ञता की सराहना की, और सरकार की वित्तीय अनुशासन के प्रति प्रतिबद्धता पर प्रकाश डाला। विपक्षी आलोचना और राज्य के आर्थिक विकास पर भी चर्चा हुई।