शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
5
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
6
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
7
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
8
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
9
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
10
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
11
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
12
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
14
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
15
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
16
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
17
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
18
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
19
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
20
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
Daily Top 2Weekly Top 5

The Kashmir Files, PM Modi Ajit Pawar: द काश्मीर फाईल्स महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांची भाजपलाच 'गुगली'; थेट सभागृहातच दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2022 18:30 IST

द काश्मीर फाईल्स चित्रपट सध्या तुफान चर्चेत आहे

The Kashmir Files, PM Modi Ajit Pawar: ‘द कश्मीर फाइल्स’ हा चित्रपट सध्या फारच चर्चेत आहेत. काश्मीरी पंडितांवर झालेला अन्याय असा चित्रपटाचा विषय आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विवेक रंजन अग्निहोत्री यांनी केलं असून यात पल्लवी जोशी, अनुपम खेर, चिन्मय मांडलेकर, मृणाल कुलकर्णी, दर्शन कुमार यांच्या मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटात काही राज्यात टॅक्स फ्री केला आहे. त्यामुळे सिनेमा करमुक्त करावा, अशी मागणी भाजपाच्या आमदारांकडून केली जात आहे. भाजपाच्या राज्यातील ९२ आमदारांच्या सहीचं एक पत्रही मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करण्यात आलं आहे. या मागणीवर आज अजित पवार यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सभागृहात उत्तर दिलं.

'द काश्मीर फाईल्स' सिनेमा महाराष्ट्रात टॅक्स फ्री करण्याची मागणी विरोधी पक्षाकडून केली जात आहे. राज्याने याआधी मिशन मंगल, तानाजी, पानिपत असे सिनेमे करमुक्त केले होते. द काश्मीर फाईल्स या चित्रपटाचा उल्लेख पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या वक्तव्यामध्ये केला होता. हा सिनेमा केंद्रानेच करमुक्त करण्याचा निर्णय घेतला पाहिजे. फक्त महाराष्ट्रात करमुक्त, असा भेदभाव कशाला ठेवायचा. केंद्राने जर या चित्रपटावरील GST रद्द केला तर तो निर्णय संपूर्ण देशालाच लागू होईल. त्यामुळे अगदी जम्मू-काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यत सर्वत्रच हा चित्रपट करमुक्त होईल, अशी भाजपा नेत्यांच्या मागणीवर अजित पवारांनी गुगली टाकली.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या या उत्तरानंतर विरोधी पक्षातील काही सदस्यांनी त्यांच्या विधानावर आक्षेप घेतला होता. पण अजित पवार यांचं बोलणं संपल्याशिवाय बोलायची संधी दिली जाणार नाही असं तालिका अध्यक्षांनी स्पष्ट केलं. त्यानंतर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी सभात्याग केला. त्यावरून, 'पळाले रे पळाले' असं म्हणत सत्ताधारी सदस्यांनी 'छत्रपती शिवाजी महाराज की जय' असा जयघोष केला.

टॅग्स :The Kashmir Filesद काश्मीर फाइल्सAjit Pawarअजित पवारBJPभाजपाAnupam Kherअनुपम खेरPallavi Joshiपल्लवी जोशी