आजी आजोबांना ‘फ्री’ फिरवले; एसटीला १,४४४ कोटी मिळाले

By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2024 11:42 AM2024-03-28T11:42:57+5:302024-03-28T11:43:08+5:30

देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असतानाच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली.

The grandparents were given a 'free' spin; 1,444 crore to ST | आजी आजोबांना ‘फ्री’ फिरवले; एसटीला १,४४४ कोटी मिळाले

आजी आजोबांना ‘फ्री’ फिरवले; एसटीला १,४४४ कोटी मिळाले

मुंबई/यवतमाळ : गेली अठरा महिन्यांत २८ कोटी १० लाख ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या मोफत प्रवास योजनेचा लाभ घेतला. या प्रवासाची प्रतिपूर्ती रक्कम म्हणून शासनाने १ हजार ४४४ कोटी ५३ लाख रुपये एसटीला अदा केले आहेत. 
देशाचा स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असतानाच वयाची ७५ वर्षे पूर्ण केलेल्या ज्येष्ठ नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याची योजना राज्य सरकारने जाहीर केली. एसटीने ही योजना २६ ऑगस्ट २०२२ पासून  राज्यभरात अंमलात आणली. यामुळे राज्य परिवहन महामंडळाच्या कोणत्याही बसमधून ज्येष्ठ नागरिकांना 
मोफत प्रवास करण्याची मुभा मिळाल्याने  ज्येष्ठांनी त्याचा चांगला लाभ घेतला. या योजनेमधून मिळालेली प्रवासी संख्या एसटीसाठी लाभदायी ठरली.  

बसचा तुटवडा : लालपरीपुढे आव्हान
काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडे १८ हजार बसेस होत्या. हळूहळू त्या आज १५ हजारांवर आल्या आहेत. त्यातीलही दररोज दोन ते अडीच हजार बसेस विविध कारणांमुळे रस्त्यावर धावत नाहीत. प्रत्यक्षात १३ हजार ५०० बसेस प्रवाशांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत. महामंडळाच्या बसमधून दररोज ५० ते ५२ लाख प्रवाशांची वाहतूक केली जाते.  

किलोमीटरवर भर 
गर्दीच्या हंगामात दररोजचे किलोमीटर वाढविण्यावर भर दिला जाणार आहे. एका बसची फेरी २०० किलोमीटर असेल तर ती ३०० किलोमीटर करून बसमधील गर्दी कमी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

Web Title: The grandparents were given a 'free' spin; 1,444 crore to ST

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.