शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
3
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
4
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
5
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
6
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
7
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
8
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
9
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
10
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
11
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
12
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
13
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
14
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
15
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
16
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
17
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
18
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
19
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
20
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....

मराठवाड्यासाठी महायुती सरकारची घोषणांची पोतडी आज खुली करणार, हजारो कोटींचे पॅकेज मिळणार

By यदू जोशी | Updated: September 16, 2023 08:00 IST

Marathwada : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार मराठवाड्याला हजारो कोटी रुपयांचे पॅकेज देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे.

- यदु जोशी मुंबई - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सरकार मराठवाड्याला हजारो कोटी रुपयांचे पॅकेज देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल झाले आहे. शनिवारी होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुती सरकार मराठवाड्यावर निधीचा आणि घोषणांचा प्रचंड वर्षाव करणार आहे.

तब्बल सात वर्षांनंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्य मंत्रिमंडळाची बैठक होत आहे. मराठवाड्याला या बैठकीच्या निमित्ताने काय काय द्यायचे यावर गेले आठ दिवस मंत्रालयात सरकारी पातळीवर मोठे चिंतन-मंथन झाले. मंत्री कार्यालयाकडून आणि सचिवांकडून प्रस्ताव मागवण्यात आले आणि त्यातून एक पॅकेज तयार करण्यात आले आहे. त्यातील संभाव्य घोषणांचा महत्त्वाचा तपशील हाती लागला आहे.   

३,२२५ कोटींची धवलक्रांती मराठवाड्यात दूध उत्पादनाला वेग देण्यासाठी ३,२२५ कोटी रुपयांची योजना प्रस्तावित आहे. मराठवाड्यातील ८,६०० गावांचा समावेश करण्यात येईल. वैयक्तिक बचत गट शेतकरी उत्पादक कंपनी किमान पाच व कमाल १० दुधाळ जनावरांचे वाटप केले जाईल. एका गावात किमान ५० दुधाळ जनावरांचे अनुदान तत्त्वावर वाटप करण्यात येणार आहे. 

बांधकाम विभागाचे पॅकेज १२ हजार कोटींचे- मराठवाड्यातील १०३० किलोमीटर लांबीच्या ३१ रस्त्यांची सुधारणा. त्यासाठी १०,३०० कोटी रुपये खर्चाची योजना.- नांदेड गोदावरी घाट हा साबरमती नदीच्या धर्तीवर रिव्हर फ्रंट म्हणून विकसित केला जाईल. १०० कोटी रुपये प्रस्तावित.- महाराष्ट्र राज्य रस्ते सुधारणा प्रकल्प टप्पा तीनमध्ये मराठवाड्यातील ३०० कि.मी. लांबीच्या रस्त्यांची सुधारणा. त्यावर २,४०० कोटी रुपये खर्च.

कोणत्या योजनांना किती निधी? - मराठवाड्यातील ग्रामपंचायतींना इंटरनेट जोडणी देणे : २८४ कोटी- पुणे-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टम बसविणे : १८८ कोटी - संत ज्ञानेश्वर उद्यान पैठण विकसित करणे - १५० कोटी - शनी देवगाव उच्च पातळी बंधारा : २८५ कोटी- पश्चिम वाहिनी मदनद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प  : १४,०४० कोटी- तुळजाभवानी मंदिर विकास  : १,३२८ कोटी- श्री साईबाबा तीर्थक्षेत्र विकास आराखडा पाथरी, जि. परभणी : ९१.८० कोटी- श्रीक्षेत्र औंढा नागनाथ या तीर्थक्षेत्राचा विकास : ६० कोटी

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारMarathwadaमराठवाडाEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसAjit Pawarअजित पवार