शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

मराठीला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय अखेर निघाला, केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते उदय सामंत यांनी स्वीकारला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 12:28 IST

Marathi Language News: मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन आदेश तीन महिने लोटले तरी निघाला नसल्याने निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. अखेरीस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय केंद्र सरकारने आज काढला.

दीर्घकाळापासून सुरू असलेल्या मागणीची दखल घेत केंद्र सरकारने ३ ऑक्टोबर मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याची घोषणा केली होती. मात्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घेण्यात आलेल्या निर्णयाचा शासन आदेश तीन महिने लोटले तरी निघाला नसल्याने निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत होतं. अखेरीस मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय केंद्र सरकारने आज काढला असून, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या हस्ते राज्य सरकारमधील मंत्री उदय सामंत यांनी हा शासन आदेश स्वीकारला. त्यामुळे आता मराठी भाषा ही अधिकृतरीत्या अभिजात भाषा ठरली आहे.

केंद्रीय सांस्कृतिक मंत्र्यांच्या हस्ते मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देणारा शासन निर्णय स्वीकारल्यानंतर उदय सामंत यांनी महाराष्ट्रातील जनतेच्यावतीने तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे  व अजित पवार यांच्यावतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांचे आभार मानले. यावेळी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना उदय सामंत म्हणाले की, अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर जे काही लाभ मिळतात, ते मिळवण्यासाठी आम्ही तातडीने प्रस्ताव सादर करणार आहोत, असे त्यांनी सांगितले.

उदय सामंत पुढे म्हणाले की, योगायोग म्हणजे ११ वर्षांपूर्वी जेव्हा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून जो प्रस्ताव पाठवण्यात आला, त्यावेळी मी राज्यातील मराठी भाषेचा पहिला राज्यमंत्री होतो. तर आज देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात मराठा भाषेचा कॅबिनेट मंत्री झाल्यानंतर हा शासन निर्णय माझ्या हातात आणण्याचं भाग्य नियतीने लिहून ठेवलेलं होतं. म्हणून आता आमची जबाबदारी वाढलेली आहे, असं मला वाटतं. तसेच या जबाबदारीने काम करून मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन केवळ महाराष्ट्रातच नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीवर कसं केलं जाईल, यासाठी आम्ही पाठपुरावा करतोय, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, केंद्र सरकारने मराठीला अभिजात दर्जा जाहीर करून तीन महिने लोटले असले तरी, अद्यापही या संबंधात असा दर्जा दिल्याचे अधिकृत पत्र किंवा केंद्राचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला नसल्याची स्थिती आहे. याबाबत केंद्रीय संस्कृती मंत्रालयाला तीनदा स्मरणपत्र देऊन विचारणा केली असता उत्तर देण्यास टाळाटाळ केली जात असल्याचा आरौप मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीतर्फे करण्यात आला होता. 

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रCentral Governmentकेंद्र सरकारMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारUday Samantउदय सामंत